.
*इंदापूर बस आगारच्या चालक वाहक कोविड योद्धा यांचा बावडा येथे रिपब्लिकन पक्ष व ग्रामस्थ यांचे वतीने सत्कार....*
*
बावडा-प्रतिनिधी दि. 18
***************
इंदापुर तालुक्यातील बावडा येथे
आज मंगळवार दि. 18 रोजी कोरोना च्या संकट काळात 5 महिन्यानंतर पहिल्यांदाच इंदापूर बस आगार यांचे मार्फत बावडा मार्गे इंदापूर -वालचंदनगर बस सेवा चालू करण्यात आल्यामुळे बावडा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाचे वतिने वाहण चालक यांचा बावडा येथे सत्कार
बावडा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाचे
सरचिटणीस राकेश कांबळे यांनी पक्षाच्या वतीने तसेच समस्त बावडा ग्रामस्थ यांचे वतीने बस चे पूजन करून चालक व वाहक यांचा फेटा, नारळ, आणि अहिंसाचे प्रतीक पिंपळाचे पान देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे जीव धोक्यात घालून सेवा बजावत असल्याने चालक वाहक यांना पेढा देण्यात येऊन कोरोना चा प्रादुर्भाव लवकरात लवकर कमी व्हावा अशी सर्वांच्या वतीने इच्छा व प्रार्थना व्यक्त करण्यात आली. तसेच या प्रसंगी चालक वाहक यांना जंतू नाशक सनी टायजर भेट देण्यात आले. आणि इंदापूरचे आगार व्यवस्थापक व कर्मचारी यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले व सर्वांनी स्वतः ची काळजी घेऊन सेवा द्यावी असे आवाहन करण्यात आले.
यावेळी रोहन कांबळे, विशाल घाडगे, विशाल कांबळे, अर्जुन मगर, आण्णा कांबळे, अभिजित कांबळे, नितीन बीबे, निखिल कांबळे, बाळासो कांबळे, सुनील कांबळे, संतोष शिंदे, प्रदीप आवारे, राजवैभव कांबळे, शुभम कांबळे इत्यादी सहित इतर बावडा ग्रामस्थ व रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा