*पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव*
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणून ए डबल फ्लस मानांकन
इंदापूर(प्रतिनिधी): शिवाजी पवार
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणून ए डबल फ्लस मानांकन मिळाला असून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ विष्णू लांडे यांचे कार्य कौतुकास्पद असून अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा ,क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अतिशय सामान्य कुटुंबातून खडतर प्रवास करणारे आपले शैक्षणिक जीवन सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परिते या ग्रामीण भागातील खेडेगावांमध्ये कर्तबगार उमललेलं नेतृत्व म्हणेज सोमनाथ लांडे आपलं शिक्षण जगाचा पालनहार विठुराया , जगाला उद्धार करणारी अशी चंद्रभागा आणि चंद्रभागेच्या तिरी भक्त पुंडलिकांसाठी साक्षात जगाचा पालनहार विटेवर अवघे अठ्ठावीस युगे उभा राहीला आहे अशा या विठ्ठलाच्या नगरीमध्ये आपलं ज्ञान संपादन केले.
आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी, आपल्या तालुक्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी, आपल्या जिल्ह्याचे, आपल्या महाराष्ट्राचं व देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी अतिशय जिद्दीने चिकाटीने शैक्षणिक जीवन त्यांनी यश संपादन केले.
इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत झाले आणि विद्यार्थ्यांना विद्यादान करत असतानाचं आपण एवढ्यावरच न थांबता त्यांनी एम .पी. एस .सी .स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली.
पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले व गडचिरोली या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत झाले. त्यानंतर त्यांची बढती होऊन त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून फलटण पोलीस स्टेशन या ठिकाणी ते कार्यरत झाले. नंतर त्यांना लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे आपले कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून रूजू होऊन लौकिकास्पद काम केले.
त्यानंतर त्यांची बदली बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या ठिकाणी त्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पोस्टिंग करण्यात आली. वडगाव निंबाळकर येथे कार्यरत असताना आपल्या पदाचा सर्वसामान्य, दिनदलित ,वंचित, सर्वच घटकांना न्याय देण्याचं काम केले. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम कौशल्यपूर्ण त्यांनी केले.
आपल्या पोलिस स्टेशनचा सर्व कारभार डिजिटल, ऑनलाईन पोलीस स्टेशन केलं या कामाची शासनाने दखल घेऊन महाराष्ट्र सरकार यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ विष्णू लांडे यांना त्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला स्मार्ट पोलीस स्टेशन ए डबल फ्लस मानांकन देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमनाथ लांडे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशनचे मधील आपले सहकारी आणि वडगाव निंबाळकर गावांमधील सामाजिक, राजकीय , कला, सांस्कृतिक, नाट्य , शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा