Breaking

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

*नीरा भीमा कारखान्यावरती श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना उत्साहात*

advt *************************************

------------------------------------------ 
*नीरा भीमा कारखान्यावरती श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना उत्साहात*


शहाजीनगर येथील नीरा भीमा कारखान्यावरती श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करताना कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील.
------------------------------------------ 

इंदापूर :प्रतिनिधी शिवाजी पवार

 शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती आज शनिवारी (दि.२२) रोजी सकाळी श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांच्या हस्ते उत्साहात व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून करण्यात आली. 
यावेळी विधिवत पूजेचे पौराहित्य कैलास गुरव यांनी केले.या प्रतिष्ठापना कार्यक्रम प्रसंगी अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
  राज्याचे माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्याच्या  कार्यस्थळावर अतिशय सुबक व देखणे असे श्रीगणेशाचे मंदिर उभारले आहे. या मंदिरामध्ये गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे सभामंडपात श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आज आनंदी  वातावरणात करण्यात आली. यावेळी कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी श्री गणेशाने जनतेची कोरोनाच्या संकटातून सुखरूप सुटका करावी,असे साकडे घातले.
_______________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा