Breaking

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

भा. ज. पा. पुणे जि. ग्रामीण संयोजक भटके-विमुक्त अाघाडी अध्यक्षपदी शिवाजी तरंगे यांची निवड


भा. ज. पा. पुणे जि. ग्रामीण संयोजक भटके-विमुक्त अाघाडी अध्यक्षपदी शिवाजी तरंगे यांची निवड


इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार

 भारतीय
 जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीण संयोजक भटके-विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी मा. शिवाजीराव तरंगे यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांचे निवडीचे पञ मा. गणेशजी भेगडे अध्यक्ष भा.ज.पा. पुणे जिल्हा ग्रामीण यांच्या सहीने नियुक्तीचे पत्र देण्यात अाले.

सामाजीक कार्यकर्ते शिवाजीराव तरंगे यांची निवड भटके-विमुक्त अाघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात अाली अाहे. त्यांना अनेक वर्षापासुन समाजसेवेचा प्रदिर्घ अनुभव अाहे.पक्षाने दिलेल्या जबाबदारीला शंभर टक्के न्याय देऊन समाजातील सर्व भटके-विमुक्तांच्या प्रश्नांना वाचा फोडीन व पक्षाच्या माध्यमातुन न्याय माळवुन देण्यासाठी सदैव प्रयन्तशील राहणार असल्याचे शिवाजी तरंगे यांनी सांगीतले.

 सदर निवडीच्या वेळेस  खासदार गिरीश बापट, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडचे अामदार राहुल कुल, बाळासाहेब भेगडे व पक्षाचे कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते.

   शिवाजी तरंगे यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीण संयोजक भटके-विमुक्त आघाडी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा  सत्कार तरंगवाडी येथे पोपटराव कचरे मिञ परिवारा तर्फे करण्यात अाला. यावेळी  पोपट कचरे युवा नेत, विकास सांगवे, प्रदीप बुटे, राजेंद्र वाघमोडे, दादा सांगवे, अनिल देव्हारे, काका देव्हारे, अजित तरंगे, अभिमन्यू बुटे, लक्ष्मण बुटे,  बाळासाहेब नरूटे व पंचक्रोशीतिल पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ या वेळी बहु संख्येनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा