*
*राज्यावर आलेले कोरोनाचे संकट विघ्न गणराया लवकरच नष्ट करा पालक मंत्री-दत्ताञय भरणे*
------------------------------------------
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
श्री. गणपती हे महाराष्ट्राचे लाडके व आराध्य दैवत अाहे.
सर्व महाराष्ट्रात मंगलमय वातावरणात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना उत्साही वातावरणात घरोघरी करण्यात येत आसते. याच पवित्र भावनेने राज्यमंत्री श्री.दत्तात्रय भरणे यांनी देखील त्यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी पत्नी सौ.सारिका भरणे, मुलगा श्रीराज, पुतणी केताली, शीतल व पुतण्या अक्षय प्रितेश व बाकी कुटुंबियांसह दिमाखात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली.
यावेळी राज्यमंत्र्यांनी गणरायाला संकटी पावावे - निर्वाणी रक्षावे अशी प्रार्थना करून राज्यावर देशावर तसेच जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकरच नष्ट करण्यासाठी व सर्वत्र प्रेमभाव, आनंद नांदण्यासाठी साकडे घातले. यावेळी राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी जनतेला देखील कोरोनाचे संकट टाळण्यासाठी सर्व योग्य ती खबरदारी घेऊन गणरायाचे स्वागत व गणेशोत्सव सण आनंदात साजरा करावा असे आवाहन देखील केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा