Breaking

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

अर्जुन पुरस्कार विजेते सुरेश जाधव यांचा सत्कार मा. हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते संपन्न

.


अर्जुन पुरस्कार विजेते सुरेश जाधव यांचा सत्कार मा. हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते संपन्न

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार

     करमाळ्यातील सुयश जाधव यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अपघातात दोन्ही हात गमावले असतानाही त्यांनी ’अर्जुन पुरस्कारा ' सह अनेक पुरस्कार कमावले आहेत. 

       भारत सरकारचा सुयश जाधव यांना यंदाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार सत्कार करण्यात आला.  

         राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार असो, एकलव्य पुरस्कार असो सुयश जाधव एकापाठोपाठ एक पुरस्कार आणि पदके पटकावित होते. दोन्ही हात गमावल्यानंतर सुयशने राज्य स्तरावर ५० सुवर्ण पदक, राष्ट्रीय स्तरावर ३७ सुवर्ण पदक, आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ सुवर्ण पदकांसह आजवर १११ पदकांची कमाई केलीय. २०१६ मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुयश यांनी देशाला पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळावीत मोठा सन्मान मिळवून दिलाय. त्याची सर्व कामगिरी पाहून भारत सरकारने सुयश यांना यंदाचा अर्जुन पुरस्कार जाहीर केलाय. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतीं मा. रामनाथ कोविंद यांचे हस्ते  वितरण केले जाणार आहे. त्याच्या जिद्दीला आणि कष्टाला सन्मानित केले आहे.
   यावेळी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, महेंद्रदादा रेडके,   सदस्य- पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ पुणे, दत्तात्रय पांढरे, पवनराजे घोगरे व  प्रविण पवार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा