.
*माझ्या शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर सदैव असेच हसू फुलूदेत. - प्रविण माने*
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील पाझर तलावातील पाण्याचे पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती प्रविण माने यांच्या शुभहस्ते जलपूजन करण्यात आले. इंदापूर तालुका पावसाच्या बाबतीत तसा दुष्काळी भाग म्हणुन ओळखला जातो दरवर्षी परतीच्या पावसाचीच काय ती मेहरबानी होऊन इथे पाऊस पडत असतो.
परंतू यंदा इंदापूर तालुक्यावर पावसाने चांगलीच कृपादृष्टी दाखवली यामुळे ऐन पावसाळ्यात ऑगस्ट महिना अाखेरच हा पाझर तलाव भरल्याचे दिसत आहे. गेल्या १० वर्षांत पहिल्यांदाच हा पाझर तलाव पावसाच्या पाण्याने भरला असल्याने येथे उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
आजच्या या जलपूजन कार्यक्रमच्या निमित्ताने बोलत असतात प्रवीण माने यांनी उपस्थितांशी संवाद साधला. वरुण राजाची अशीच कृपादृष्टी सदैव आपल्या इंदापूर तालुक्यावर राहो, व माझ्या शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर सदैव असेच हसू फुलूदेत असे
उदगार त्यांनी यावेळी काढले.
पळसदेव येथील पाझर तलवात जमा झालेल्या या पाण्यामुळे पळसदेव, मराडवाडी व रुई येथील शेतकरी बांधव खुश आहेत. यंदा पाण्याची चणचण जाणवणार नाही याबाबत त्यांच्या मुखावर एक प्रकारचे समाधान पहावयास मिळते आहे.
आजच्या या पाणी पूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने मेघराज कुचेकर, अनिल खोत, सुजित मोरे, दत्तात्रय शेलार, सतीश मोरे,सुनिल कणके,तसेच पळसदेव गावचे समस्त ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा