मराठा आरक्षण:- शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत SEBC आरक्षणाचा मिळालेल्या लाभास महाराष्ट्र सरकार व शिक्षण खात्याच्या वतीने स्थगिती न देता लाभ देण्यात यावा...मराठा सेवा संघ नांदेड
नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.९ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षण याचिका घटना पीठाकडे वर्ग करताना आरक्षणाच्या अमलबजावणीस तूर्त स्थगिती दिली आहे. दि.९ सप्टेंबर पुर्वी राज्यात झालेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया, RTE, 11 वी प्रवेश, NEET, TET पेपर 1व 2 चा निकालातील SEBC आरक्षणाचा मिळालेल्या लाभास महाराष्ट्र सरकार व शिक्षण खात्याच्या वतीने स्थगिती न देता लाभ देण्यात यावा यासाठी मराठा आरक्षणाच्या बाबतीत मागण्याचे निवेदन मराठा सेवा संघ नांदेडच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री मा.ना.प्रा.वर्षाताई गायकवाड यांना देण्यात आले...
यावेळी मराठा सेवा संघाचे तेलंगणा प्रभारी प्रा डाॅ गणेश शिंदे ,प्रसिद्ध वक्ते प्रा.संतोष देवराये जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर उध्दवराव पाटील सुर्यवंशी ,रमेश पवार ,रवी पाटील ढगे आदींची उपस्थिती होती...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा