Breaking

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

अकोले बुद्रुक चे माजी सरपंच शत्रुघ्न परबत पाटील यांचे दुःखद निधन*



टेंभुर्णी (प्रतिनिधी )टेंभुर्णी पासून जवळच असलेल्या अकोले बुद्रुक येथील 35 वर्ष सरपंच असलेले शत्रुघ्न सुबराव परबत -पाटील (वय 85) रा. अकोले बुद्रुक तालुका माढा यांचे आज दुपारी  2.30 च्या दरम्यान अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले असून त्यांनी सरपंच असताना माढा तालुक्यातील राजकारणात आपला ठसा चांगला उमटवला होता.  त्याच्या पश्चात पत्नी , २ मुले मुलगी नातवंडे असा परिवार आहे. मार्केट कमीटी कुर्डवाडी चे संचालक   प्रभाकर परबत-पाटील यांचे ते वडिल होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा