डॉ.अभिजित नीळ यांच्या कडून रुग्णांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप
करमाळा प्रतिनिधी- अतुल वारे पाटील
निमगाव ह. येथील डॉ.अभिजित निळ यांच्या कडून दिवाळी सणानिमित्त करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना आज दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.सदर फराळाचे वाटप राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे यांच्या हस्ते करण्यात आले.अॅड.बालाजी पिंपरे व डॉ.राऊत यांच्या प्रमूख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे यांनी डॉ नीळ यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून यासारखे उपक्रम अधिकाधिक नागरिकांनी राबवण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,शहर अध्यक्ष ओंकार पलंगे,जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य अविनाश वाघमारे,शहर उपाध्यक्ष आनंदराव कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस जयकुमार कांबळे,शहर उपाध्यक्ष बाळा सुकळे,शहर कार्यकारिणी सदस्य गणेश शेवंते,राजू देमुंडे,अमर अनभुले,भैय्या रोकडे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा