*पोथरे येथे किल्ले बांधा स्पर्धेचे आयोजन*
अतुल वारे पाटील- करमाळा
करमाळा/प्रतिनिधी
दिवाळी आणि किल्ला हे बालगोपाळांचे आवडीचे समीकरण आहे. ही आवड जोपासण्यासाठी ठिकठिकाणी दिवाळीनिमित्त किल्ले बांधा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
करमाळा तालुक्यातील पोथरे येथे अशाच एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बाल शिवभक्तांना प्रोत्साहनपर बक्षीसही देण्यात येणार आहे.
किल्ला बनवणाऱ्या स्पर्धकांनी अगोदर नोंदणी करावी व किल्ला पहाणी दिवाळीच्या दिवशी १४/११/२०२० रोजी करण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे.शरद झिंजाडे पाटील यांच्यातर्फ प्रथम बक्षीस 1555 रुपये,
हरिभाऊ मच्छिंद्र झिंजाडे
(मा.सचालक मकाई सह.सा.कारखाना) यांचेकडून1111 रुपये
.आदिनाथ प्रेमराज झिंजाडे यांच्यातर्फे तृतीय बक्षीस 777 रुपय चतुर्थ क्रमांक बक्षिस शिवार हाॅटेल प्रोप्रा.पप्पु यादव रुपये 555, 2 उत्तेजनार्थ बक्षीसे 201 रुपये दादासाहेब झिंजाडे यांच्यातर्फ देण्यात येणार आहेत. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस-२०1 रुपये शूभम आॅफसेट जेऊर यांच्याकडून तसेच देवराई नर्सरी,प्रोप्रा सचिन प्रमोद झिंजाडे यांच्यातर्फे क्रंमाक ७ नंतरील १० स्पर्धकांना गावात वृक्षवाढ होण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वडांची झाडे भेट देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या खर्चाकरिता किरण पाटील यांच्याकडुन 500 रुपये देण्यात आले आहेत.
अधिकाधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा