Breaking

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

इंदापूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या बाटली फोड आंदोलन* ******************************. *प्रशासकीय अधिकार्‍यांचे धाबे दणाणले*



*इंदापूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या बाटली फोड  आंदोलन*


    ******************************
*प्रशासकीय अधिकार्‍यांचे धाबे दणाणले* 
*****************************


*रेडा प्रतिनिधी/ ‌रेडा ता. इंदापूर*

 रेडा प्रतिनिधी दि 6.
 प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक* ना. बच्चुभाऊ कडू राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य . व संपर्क प्रमुख मा.अजय महाराज बारस्कर व पुणे जिल्हा संघटक शिवश्री नीरज भाऊ कडू पाटील.
यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने इंदापूर येथे बाटली फोड आंदोलन करण्यात आले.
इंदापूर तालुक्यात अवैध व्यवसायांना ऊत आलेला असून यावर इंदापूर पोलीस स्टेशन , वालचंद नगर पोलीस स्टेशन, बावडा पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क च्या  अधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे
ते अधिकारी मात्र या व्यवसायाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून त्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने ते तालुक्यामधील व्यवसाय करणाऱ्या लोकांकडे डोळे झाक  करत असून यामुळे अनेकांचे प्रपंच दारुमुळे बरबाद झाली आहेत अनेक गोरगरिबांना कोणा मुळे कुटुंब चालवणे मुश्कील झाले आहे .त्यातच असे अवैध व्यवसायामुळे अनेक कुटुंब बरबाद झाले आहेत. या कुटुंबाला  प्रशासनच जबाबदार आहे .
याबाबत ‌ प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सदरच्या अवैध धंद्या   बाबत तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालत असल्याचे दिसून आल्याने तालुक्यात अनेक गावांमध्ये  अवैध धंदे सुरू असुन सदरचा प्रकार याबद्दल निवेदन देऊन बंद होत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी तालुका अध्यक्ष संजय राऊत, उपाध्यक्ष शशिकांत सोनटक्के, शहराध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर  पोलीस स्टेशनचे पी आय सारंगकर साहेब,तसेच इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी मॅडम यांना 26/9/2020रोजी निवेदन देण्यात आले होते.निवेदनात तालुक्यातील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची मागणी करण्यात आली होती.
यावर दहा दिवस उलटून गेले तरीही,यावर काहीही कारवाई झालेली दिसुन येत नाही म्हणून.प्रहार पक्षाच्या ह्या निवेदनाकडे त्यांनी गंभीरतेने लक्ष दिली नसल्याने प्रहार जनशक्ती च्या वतीने दि. 6 नोव्हेंबर रोजी इंदापूर तहसील कार्यालया॒- समोर बाटली फोड आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. इंदापूर येथे आंदोलन चालू असताना तहसील कार्यालयाकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना चर्चा करण्यास बोलावून घेतले व  यावर तातडीने कारवाई करण्याचे लेखी आदेश इंदापूर पोलिस स्टेशनचे पी. आय. सारंगकर यांना देण्यात आला.सदरील आदेशानुसार कारवाई न झाल्यास पुढील काळात प्रहार स्टाइलने‌ आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.असे आमच्या प्रतिनिशी बोलताना प्रहार च्या कार्यकर्त्यांनी  प्रतिक्रिया  कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
सदरचे आंदोलन यशस्वी करण्यामागे प्रहार जनशक्ती पक्ष इंदापूर तालुका कार्यकारणी, तसेच प्रहार अपंग क्रांती संस्था, पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे , इंदापूर शहराध्यक्ष दीपक आरडे, कार्यकर्ते अनंतराव गायकवाड ,भोसले, ‌ इत्यादी कार्यकर्त्यांनी व पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी आघाडी अध्यक्ष अशोक शिंदे व इतर कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे सरचिटणीस तानाजी (अण्णा )धोत्रे, रिपब्लिकन क्रांती सेना चे संस्थापक अध्यक्ष ‌ प्राध्यापक बाळासाहेब लोखंडे सर, बसपाचे कार्यकर्ते श्रीपती चव्हाण , दलित पॅंथर माथाडी कामगार संघटना इंदापुर शहराध्यक्ष व नामदार बच्चु भाऊ यांचेवर प्रेम करणारे
सोनू भाऊ ढावरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा