Breaking

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने 'संभाजी बिडी' चे नाव बदलल्याने करमाळ्यात जल्लोष**



*संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने 'संभाजी बिडी' चे नाव बदलल्याने करमाळ्यात जल्लोष*

*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विकली जाणारी बिडी आता 'साबळे बिडी' या नावाने विक्री होणार याबाबतचे वृत्त कळताच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटत तसेच फटाके फोडत जल्लोष केला.
   याबाबत बोलताना संभाजी ब्रिगेड  जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ म्हणाले की , हे नाव बदलण्यासाठी संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्षे लढा देत आहे.
संभाजी ब्रिगेड' च्या अनेक वर्षाच्या लढ्याला अखेर यश आले. 

कोल्हापूर येथे दि. 20 ऑगस्ट २०२० रोजी संभाजी ब्रिगेडचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष  रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संभाजी बिडी ची गाडी पकडली आणि ज्या ज्या ठिकाणी विक्री केली जात होता त्या व्यापाऱ्यांना संभाजी ब्रिगेडने ठणकावून विरोध करण्यास भाग पाडले. व्यापाऱ्यांनी सुद्धा विक्री करण्यास बंद केले व सुमारे २० लाख रुपयाचा जुना माल कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी साबळे-वाघेरे कंपनीला परत पाठवला. त्यानंतर दि. 10 सप्टेंबर 2020 रोजी साबळे कंपनीने संभाजी ब्रिगेड' च्या दबावाखाली अधिकृत पत्रकार परिषद घेऊन नाव बदलणार हे जाहीर केले होते. व्यवस्थापनाने नाव बदलण्यासाठी थोडा अवधी मागितला होता. 



इचलकरंजीत मागील पंधरा दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी परत गाड्या अडवल्या. कारण नाव संभाजी महाराजांचे असल्यामुळे ते कुठल्याही 'शिवप्रेमी' कार्यकर्त्याला सहन होत नव्हते. त्यामुळे साबळे वगैरे कंपनीला हा तात्काळ निर्णय घ्यावा लागला. 

'बिडी' विरोधातील संपूर्ण आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष  ऍड मनोजदादा आखरे व महासचिव सौरभ  खेडेकर यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला 'बिडी' बंद झाली पाहिजे यासाठी आदेश दिले होते. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर मधील सर्व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन लावून धरले. यात सर्वात मोठे यश कोल्हापूरचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, अभिजीत कांजर, निलेश सुतार, विकी जाधव, अभिजित भोसले, भगवान कोईगडे, विक्रमसिंह घोरपडे, अमरसिंह पाटील, मदन परीट, उमेश जाधव आदी कार्यकर्त्यांनी प्रचंड संघर्ष करून आंदोलन यशस्वी केले.

 महापुरुषांच्या नावाचा कोणीही गैरवापर करू नये, संभाजी ब्रिगेड   ते खपवून घेणार नाही असा इशारा  जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ यांनी  यावेळी दिला.
       यावेळी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अमित घोगरे,जिल्हा संघटक गणेश सव्वाशे, तालुका सचिव गणेश डोके,मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,उपाध्यक्ष बाळासाहेब झोळ, सचिव सचिन शिंदे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा