Breaking

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून घ्यावी - राजेंद्र गुंड विठ्ठलवाडीच्या श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती साजरी





अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून घ्यावी -  राजेंद्र गुंड सर

विठ्ठलवाडीच्या श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती साजरी

टेंभुर्णी / प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अन्याय करणा-या शत्रूंशी लढा व संघर्ष करीत सर्वसामान्य जनता आणि गोरगरीब रयतेसाठी स्वराज्याची स्थापना करून न्याय मिळवून दिला तोच आदर्श आजच्या पिढीने डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही क्षेत्रातील अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून घ्यावी असे प्रतिपादन आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले आहे.

ते विठ्ठलवाडी ता.माढा येथील श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती मुर्तीचे पूजन जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष तथा उद्योजक विलास पारखे, चेअरमन अनिलकुमार अनभुले व सुनील शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी विठ्ठलवाडीचे प्रगतशील शेतकरी तथा माजी सरपंच बालाजी गव्हाणे होते.

पुढे बोलताना राजेंद्र गुंड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने समाजासमोर कृतीयुक्त आदर्श ठेवला आहे त्याप्रमाणे आजच्या पिढीने योग्य दिशेने वाटचाल करावी याकरिता गावोगावच्या वडिलधाऱ्या व नेतेमंडळींनी चांगला आदर्श स्वकृतीतून निर्माण केला पाहिजे. देशाची भावी पिढी सुसंस्कृत व संस्कारक्षम बनविण्यासाठी आई-वडिल व शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.आजच्या पिढीतील युवकांनी वाईट व्यसनापासून दूर राहून दर्जेदार साहित्य आणि पुस्तकाचे वाचन करून स्वत:च्या करिअरला प्राधान्य दिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अनिलकुमार अनभुले, वाचनालयाचे अध्यक्ष व नूतन ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भांगे सचिन नेताजी उबाळे,सोसायटीचे उपाध्यक्ष बाळू गुंड,महादेव कदम, अनंता जाधव,धनाजी सस्ते,कांतीलाल मुळे,पोलीस पाटील बालाजी शेगर, नेताजी कदम,शिवाजी जाधव, ग्रंथपाल अमोल जाधव,रविंद्र शेडगे, शिवाजी खरात,लक्ष्मण गव्हाणे, दत्तात्रय खैरे,किशोर गुंड,सुरेश शेगर, सतीश गुंड,अशोक कदम,गणेश दळवी,अजित बरबडे,अमोल गव्हाणे, भिवाजी जाधव,संदिप मुळे,बबलू नागटिळक,मेजर बालाजी कदम, सत्यवान शिंगाडे,सोमनाथ कदम, शिवाजी कोकाटे,राजाभाऊ सस्ते, तुकाराम मस्के,सुभाष सस्ते,पमुलाल जाधव,अविनाश माने,भिमराव नागटिळक,शिवाजी काशीद,युवराज शेगर,विजय काशीद,संदिपान खरात, सुरेश कदम,भास्कर जाधव यांच्यासह ग्रामस्थ व वाचनालयाचे सभासद उपस्थित होते.

शेवटी आभार प्राथमिक शिक्षक सज्जन मुळे यांनी मानले.

फोटो ओळी - विठ्ठलवाडी ता.माढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अर्धाकृती मुर्तीचे पुजन करताना वाचनालयाचे पदाधिकारी, ग्रामस्थ व इतर मान्यवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा