Breaking

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

दारफळचे संतोष चव्हाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान




दारफळचे संतोष चव्हाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
माढा / तालुका प्रतिनिधी- रेणुका राजपूत
- माढा तालुक्यातील दारफळ सीनाचे रहिवासी व सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरे-पागे येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असणारे संतोष राजाराम चव्हाण यांना महाराष्ट्र राज्य आदर्श प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते पंढरपूर येथे स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र, शाल,फेटा व पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात आला.

विविध ठिकाणच्या प्राथमिक शाळेत संतोष चव्हाण यांनी 16 वर्षांच्या शैक्षणिक सेवेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेले विशेष प्रयत्न, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी राबविण्यात आलेले शालेय व सहशालेय उपक्रम तसेच शाळा बाह्य मुलांना शाळेत आणणे, वृक्षलागवड व संवर्धन,कोरोना काळात दिलेले ऑनलाइन शिक्षण, लोकसहभागातून भौतिक सुविधा, विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन आणि दरवर्षी विज्ञान प्रदर्शनात महत्त्वाचे योगदान या बाबींची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.याप्रसंगी प्रांताधिकारी सचिन ढोले,गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे,वसंतराव देशमुख, अर्चना व्हरगर, मुख्याध्यापक खाजप्पा बनसोडे, बिभीषण रणदिवे,अंकुश काळे, विठ्ठलवाडीचे सज्जन मुळे,राजकुमार राऊत,बापू मिसाळ शिक्षक उपस्थित होते.

पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे,सभापती विक्रमसिंह शिंदे, माढेश्वरी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशोकशेठ लुणावत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक शिंदे, केंद्रप्रमुख नागनाथ उबाळे,उपसरपंच शिवाजी बारबोले,विजय शिंदे,औदुंबर उबाळे,नानासाहेब बागल,प्रदिप कांबळे,मोहन चव्हाण,बबन घोडके, कुमार शिंदे,आबासाहेब उबाळे, प्रशांत उबाळे,विजय काळे,अंकुश गवळी, ज्ञानेश्वर घोगरे यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षकांनी केले आहे.

फोटो ओळी- दारफळ ता.माढा येथील संतोष चव्हाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करताना आमदार प्रशांत परिचारक व इतर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा