Breaking

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

धार्मिक तेढ निर्माण केल्याचा व धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी शरजिल उस्मानी वर गुन्हा दाखल करा, राजसिंहा राजेनिंबाळकर यांची मागणी*


*धार्मिक तेढ निर्माण केल्याचा व धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी शरजिल उस्मानी वर गुन्हा दाखल करा, राजसिंहा  राजेनिंबाळकर यांची मागणी*



दि.30 जानेवारी 2021 रोजी पुणे येथील गणेश  कला क्रीडा मंदिर या सभागृहात एल्गार परिषद नावाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी याला भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. शरजिल उस्मानी सदर कार्यक्रमात आपल्या भाषणात त्यानी भारतीय संघराज्यविरोधात व हिंदू विरोधात अत्यंत आपत्तीजनक विधाने केली, शरजिल उस्मानी यानी हिंदू समाज सडलेला आहे अशा  प्रकारचेे हिंदूच्या धार्मिक भावना दुखावणारे व दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केले आहे. त्याचे हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153ए व 295ए (आणि इतर लागू होण्या-या कलम) अनुसार गुन्हा ठरते.
तरी शरजिल उस्मानी यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, धाराशिवच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी केली आहे. 
गेल्या अनेक वर्षापासून एल्गार नावाचा कार्यक्रम होत आहे. या परिषदमध्ये नेहमीच विधवंसक व समाजामध्ये तिढ निर्माण होईल असे सातत्याने कोणी ना कोणी समाज विघातक सडक्या मेंदुचे स्वतःला समाजाचे ठेकेदार समाजणा-या व्यक्तींकडून नेहमीच गरळ ओकली जाते व समाजामध्ये तेढ निर्माण होते. त्यामुळे समाजामध्ये विष पसरवण्याचे अशा परिषदांना सरकारने अनुमती, प्रोत्साहन देवू नये याची काळजी घ्यावी अन्यथा भविष्यामध्ये मोठया प्रमाणात समाजकंटक निर्माण होवून सामाजिक स्थैर्य, शांतता दुषित होईल. यासाठी सरकारने अशा गरळ ओकणा-या समाजविघातक शरजिल उस्मानी मनोवृतीच्या लोकांना सरकारने जेलबंद करावे हि आग्रही मागणी आम्ही करत आहोत. यावेळी उपस्थित विनोद निंबाळकर, संदिप इंगळे, राहुल शिंदे, कुलदिप भोसले, हिंमत भोसले, सुरज शेरकर, सुजित साळुंके, श्रीराम उंबरे, प्रितम मुंडे, भगवंत गुड पाटील, स्वानंद पाटील, शंकर मोरे, विजय पडवळ, प्रसाद राजमाने, रोहन घाडगे, प्रमोद गेणगे, आदित्य पाटोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
AJ 24 Taas News

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा