Breaking

शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या विभागीय प्रसिध्दीप्रमुखदी भाग्यवंत ल. नायकुडे


अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या विभागीय प्रसिध्दीप्रमुखदी भाग्यवंत ल. नायकुडे   


 माळशिरस प्रतिनिधी दि.20
अखिल भारतीय वारकरी मंडळ पुणे विभागीय कमिटी (पश्चिम महाराष्ट्र ) च्या  प्रसिध्दी प्रमुखपदी भाग्यवंत ल. नायकुडे यांची नियुक्ती करण्यात आली.
गाथा लॉन्स, संतनगर, लोहगाव या ठिकाणी अखिल भारतीय वारकरी मंडळ पुणे विभागीय (पश्चिम महाराष्ट्र) कमिटीच्या पदनियुक्ती पत्र प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले डिकसळकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. 
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कमिटी सदस्य शंकर महाराज शेवाळे, प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके, विभागीय अध्यक्ष दत्तात्रय महाराज सोळसकर, दीपक महाराज खांडवे (पुणे विभागीय उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र) माजी आमदार बापूसाहेब पठारे, आ. जगदीश मुळीक ( शहराध्यक्ष, भाजपा पुणे ) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा