Breaking

शनिवार, ३ एप्रिल, २०२१

ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार एक गंभीर*




*ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार एक गंभीर*
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे

गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथील चौकात भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. यात एक जागीच ठार एक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते.
गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथील शिवाजी खिलारे आणि बाबासाहेब मुकूटराव हे दुचाकीवरून गेवराईकडे जात असताना बायपास चौकातील वळणावर (ट्रक क्र.जीजे-01-सीवाय 5475) याने जोराची धडक दिली. 
या अपघातात शिवाजी फुलारे (वय 35) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाळासाहेब मुकूटराव (वय 45) हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीसांनी येवून ट्रक ताब्यात घेतला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा