Breaking

मंगळवार, ११ मे, २०२१

AJ 24 तास"च्या दणक्याने २४ तासांच्या आत मोकाट हिंडणारा कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्ण जेरबंद...**कालचे इशारावजा "बुलेटिन" ठरले खरे... नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव...* *अखेर रात्री उशिरा कोरोनो पाॅझीटीव्हवर गुन्हा दाखल...* *खाजगी लॅबवाल्यांचा धिंगाणा लटकला वेशीवर...* *प्रशासकीय यंत्रणा पुन्हा पडल्या उघड्यावर... लपवाछपवीचा खेळ खल्लास...* *लॅबवाले व संबंधित डाॅक्टर्सवर होणार कायदेशीर कारवाई?*


*"AJ 24 तास"च्या दणक्याने २४ तासांच्या आत मोकाट हिंडणारा कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्ण जेरबंद...*

*कालचे इशारावजा "बुलेटिन" ठरले खरे... नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव...*

   *अखेर रात्री उशिरा कोरोनो पाॅझीटीव्हवर गुन्हा दाखल...*



   *खाजगी लॅबवाल्यांचा धिंगाणा लटकला वेशीवर...*
   *प्रशासकीय यंत्रणा पुन्हा पडल्या उघड्यावर... लपवाछपवीचा खेळ खल्लास...*
  *लॅबवाले व संबंधित डाॅक्टर्सवर होणार कायदेशीर कारवाई?*



*✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे (पत्रकार) यांजकडून...*
     *काल सोमवारी खाजगी लॅबवाल्यांचा धिंगाणा चव्हाट्यावर आणल्यानंतर सर्वाची झोप उडाली असून रात्री उशिरापर्यंत कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू होते.*
      *बहुतांश नागरिक काळजी घेऊन नियमांचे पालन करुन कोरोनाशी लढा देत आहेत.गल्लोगल्ली हिंडणा-या रुग्णामुळे नागरिकांचे जीवनच धोक्यात आले आहे.*
    * परंतू त्यांची फिकीर न करता वैद्यकीय क्षेत्रातील रॅकेट व खाजगी लॅबवाले मोकाट सुटल्याने काल त्यावर पुन्हा आवाज उठविण्यात आला होता.*
     *शुक्रवारी टेंभुर्णी रोडवरील एका डाॅक्टरने अधिकृत परवानगी असलेल्या लॅबवाल्यांना सोडून व शासकीय यंत्रणानाही डावलून शहरातील एका रडारवर असलेल्या खाजगी लॅबवाल्याकडे एक रुग्ण अॅन्टीजन टेस्ट सोडून डायरेक्ट आरटीपीसीआर कोरोनो टेस्टसाठी पाठविण्यात आला होता.*
     *त्यांच्या तपासणीनंतर तो रुग्ण कोरोनो पाॅझीटीव्ह आढळून आला.हा रुग्ण टेंभुर्णी रोडवरच रहातोय.टेंभूर्णीरोडवरील एका मेडीकल दुकानदाराचे नुकतेच निधन झाले होते.तेथेच हा रुग्ण कामाला होता.हे डॉक्टर व लॅबवाले जाणून होते.तरीही दोघांनीही त्या गांभीर्याकडे पैशाच्या लालसेने त्या पाॅझीटीव्ह रुग्णास वा-यावर सोडून दिले होते.*
     *मालकाच्या मृत्यूनंतर हा "पाॅझीटीव्ह रुग्ण" मेडीकल दुकानच बेकायदेशीरपणे चालवत होता.शुक्रवारच्या तपासणीत तो पाॅझीटीव्ह आल्यानंतरही चार दिवस दुकान चालवतोय हेही उघड्या डोळ्यांनी पाहूनही सुपरस्प्रेडर डॉक्टर व लॅबवाले बेमुर्वतपणे वागत होते.*
     *या प्रकरणाचे गांभिर्य ओळखून दिवसभर सर्वं वैद्यकीय व प्रशासकीय यंत्रणांना फोन केले असता एकानेही फोन उचलला नाही.कांही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक फोन टाळले.*
      *हे गैरप्रकार ज्येष्ठ पत्रकारांनी अखेरीस सोलापूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही दूरध्वनीवरून कळविले.तरीही सर्वजण निर्ढावलेले. तो मालकाच्या मृत्यूपश्चात पाॅझीटीव्ह असतानाही दुकान चालवत असल्याने नागरिकांना सुपरस्प्रेड करीत असल्याने अखेरीस "विशेष बुलेटिन" मधून काल आवाज उठविण्यात आला होता.ही एकच केस नव्हती... अनेक...*
      *याच पाॅझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कात सुमारे चारशेजण संपर्कात आल्याचे खाजगी डॉक्टर्स व स्टाफ कडूनच सांगण्यात आले.त्याच्या संपर्कातील चार ते पाच जणांना कोरोनोची बाधाही झाली आहे.त्यास त्यांच्याबरोबरच संबंधित डॉक्टर्स व लॅबवालेही तेवढेच जबाबदार आहेत.*
      *काल रात्री न.पा.चे आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांच्या पथकाने घरी नसणा-या संबंधित रुग्णास मेडिकलमध्ये रेडहॅंड पकडून पोलिस ठाण्यात नेऊन फिर्याद दाखल करण्यात आली आहे.*
     *गेल्या महिनाभरापासून वैद्यकीय क्षेत्रातील रॅकेट व लॅबवालेविरुध्द "विशेष बुलेटिन"सातत्याने मधून आवाज उठविण्यात येत आहे.अन ग्रामीण रुग्णालयातील रॅकेटशी संबंधित काही अधिकारी मात्र अनधिकृतपणे त्यांना "परवाना" देऊन उजळण्यासाठी पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा बांधून भामट्यांच्या गळ्यात मणीहार बांधण्याचा बेकायदेशीरपणे खटाटोप करीत आहेत.अखेरीस टक्केवारीत सब घोडे बारा टक्के*
     *गैरकृत्ये करून नागरिकांच्या जिवाशी खेळणा-या संबंधित परवाना नसणा-या लॅबवाल्यांच्या तपासण्या तातडीने बंद कराव्यात व या प्रकरणातील अधिक माहिती तपासून दोषींवर  फौजदारी कारवाई करण्यात येऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व शहरवासीयां बरोबरच वैद्यकीय क्षेत्रातूनही केली जात आहे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा