Breaking

मंगळवार, ११ मे, २०२१

कुर्डुवाडीकरांनो सावधान...* *गल्लोगल्ली हिंडतायत कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्ण...कसा होणार कोरोनो कमी?* *कुर्डूवाडी मध्ये.खाजगी लॅबवाल्यांची बेफिकिरी अन् धिंगाणा सुरूच...* *त्या पत्राच्या गौडबंगालात अर्थपूर्ण भ्रष्टाचार?सर्वजणच गुंतले तुंबड्या भरण्यात...* *बंद तपासण्या पुन्हा सुरू केल्यानंतर कोरोनोत पुन्हा वाढ?*



*कुर्डुवाडीकरांनो सावधान...*  
   *गल्लोगल्ली हिंडतायत कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्ण...कसा होणार कोरोनो कमी?*
   *कुणाचे कुणावर नियंत्रणच नाही....खाजगी लॅबवाल्यांची बेफिकिरी अन् धिंगाणा सुरूच...* 
    *त्या पत्राच्या गौडबंगालात अर्थपूर्ण भ्रष्टाचार?सर्वजणच गुंतले तुंबड्या भरण्यात...*
   *बंद तपासण्या पुन्हा सुरू केल्यानंतर कोरोनोत पुन्हा वाढ?*


*✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे(पत्रकार)यांजकडून...*
    *कुर्डुवाडी शहरांत कोरोनोने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्ण तपासणी नंतरही राजरोसपणे हिंडत असल्याने नागरिकांबरोबरच आरोग्य खात्यातही संताप व्यक्त केला जात आहे.*
     *मध्यंतरी खाजगी लॅबवाल्यांच्या २० एप्रिलच्या पोलिस धाडसत्रानंतर तीनही लॅबवाल्यांना तपासणी करण्यास बंदी घातल्याचा फक्त फार्स करण्यात आला.*
    *धाडसत्रांनंतर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका सुनंदा रणदिवे यांचेशी संपर्क साधला असता लॅबवाल्यांना तपासणी करण्यास प्रतिबंध करण्याचें पत्र तयार केले असल्याचे त्यांनी दूरध्वनीवरून सांगितले होते.ते पत्र पंधरा दिवस उलटून गेले तरी पोहच तर झाले नाहीच.*
     *उलट त्या मागच्या गौडबंगालाची कसून चौकशी केली असता वैद्यकीय क्षेत्रातील रॅकेट मधील कांहीं मंडळी व एका स्थानिक शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण व्यवहार व लागेबांधीतून ते पत्रच बासनात गुंडाळून ठेवल्याचे समजते.*
     *कांहीं स्थानिक शासकीय वैद्यकीय अधिकारी व खाजगी रॅकेट मधील मंडळी यांची अनधिकृत व बेकायदेशीर सोशल मीडियावर फोटोंवर फोटो टाकून चमकोगिरी जी चालू आहे त्याबद्दलही नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू आहे.*
    *रेफर करणा-या डॉक्टरला व शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा किती वाटा? हेही लॅबवाल्यांनाच ठाऊक.महामारीच्या काळातही जी लूट चालू आहे त्याबद्दलही नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.*
    *पोलिस खात्याच्या धाडसत्रानंतर सर्वं प्रशासकीय यंत्रणा चक्रावल्या होत्या व त्या उघड्यावर पडल्या होत्या.पोलीस खात्यानेही सिव्हील सर्जनना लेखी माहिती विचारणा केली आहे.पण भामट्यांना साथ देण्यासाठी पत्रोपत्री चालू आहे पण कायदेशीर पडताळणी करण्याच्या पोलिस खात्याच्या पत्राला उत्तर देण्यास वीस दिवसांत वेळ मिळू नये.याबाबतही प्रशासकीय यंत्रणा चक्रावल्या आहेत* 
    *त्यानंतर माढा रोडवरील समर्थ लॅबवाल्यांनी आॅगष्ट २० मध्ये टेस्टींग परवानगी मागितली होती.परंतू ती तशीच लालफितीत की देण्याघेण्याच्या व्यवहारात पडून होती.धाडसत्रपश्चात व सिव्हील सर्जनना ज्येष्ठ पत्रकारांच्या "बुलेटिन" नंतर बोलणे झाले प्रमाणे दोनच दिवसात नऊ महिने कोरोनो काळाच्या कळा सोसल्यानंतर "समर्थ लॅब"ची परवानगी प्रसवली.*
      *याबाबत अधिक चौकशी करता समजले की न.पा.प्रशासन व ग्रामीण रुग्णालयाच्या सांगण्यावरून बंद केलेली उर्वरित दोन लॅबवाल्यांनी तपासण्या पुन्हा सुरू केल्याचेही समजते.यामागील भ्रष्टाचारात कोण किती सामील आहेत याचीही चविष्टपणे चर्चा आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रात सुरुच आहेत*
     *मात्र या लॅबवाल्यांची व खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील रॅकेटचा बेमुर्वतपणा व गैरप्रकार सुरुच असल्याचे समजते.प्रशासकीय यंत्रणांकडे संपर्क साधला असता ते फोनही उचलत नाहीत.सब घोडे बारा टक्के.*
   *खाजगी अनधिकृत? लॅबवाले तपासण्या करून पाॅझीटीव्ह रुग्णही वा-यावर सोडत आहेत.गल्लोगल्ली वाढणा-या रुग्णांवर कुणाचेच नियंत्रण नसल्याने व खाजगी लॅबवाल्यांच्या धिंगाण्यामुळे कोरोनो कसा कमी होणार?*
     *लॅबवाले, खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील रॅकेटशी संबंधित मंडळीत मात्र रुग्णांची स्मशानभूमीकडे वाटचाल सुरुच आहे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा