वीज टंचाईवर मात करण्यासाठी वाढीव क्षमतेचे नवीन ट्रान्सफार्मर व सब स्टेशनला मंजुरी मिळावी
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे आमदार बबनदादा शिंदे यांची मागणी
*
माढा प्रतिनिधी / रेणुका राजपूत*
सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र विजेची समस्या भेडसावत आहे माढा तालुका तसेच माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर माळशिरस तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वीजेची समस्या निर्माण झाली असून शेतकऱ्यांना अवघी 6 तास वीज सुद्धा पुरेशा दाबाने मिळत नाही वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या 33/11 केव्हीए सबस्टेशन मध्ये वाढीव पाच एमव्हीए क्षमतेचे ट्रांसफार्मर बसविण्यात यावेत तसेच नवीन 33/11 केव्हीए सब स्टेशनला तातडीने मंजुरी मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे माढयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांनी केली आहे.
सध्या मतदारसंघात सर्वत्र शेतकऱ्यांची वीजेची मागणी सातत्याने वाढत असून ऐन उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांची पिके व फळबागा यांना वेळेवर पाणी देणे आवश्यक असते.नदी ,कालवा, विहिरी, कूपनलिका,शेततळ्यात पाणी असूनही वेळेवर व पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके व फळबागा जळून नुकसान होत आहे हे टाळण्यासाठी महावितरण कंपनीच्या बार्शी विभागाच्या माढा तालुक्यातील कुर्डू, पिंपळनेर, पडसाळी,अरण, एमआयडीसी टेंभुर्णी,वरवडे आणि पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव व मेंढापूर येथील सध्या अस्तित्वात असलेल्या 33/11 सब स्टेशनमध्ये नवीन वाढीव 5 एम व्ही ए च्या ट्रान्सफार्मरला मंजुरी मिळावी तसेच माढा तालुक्यातील लऊळ व निमगाव (टें) ,पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड व रोपळे व माळशिरस तालुक्यातील जांभूड व महाळुंग या सहा ठिकाणी नवीन 33/11 सब स्टेशनला तातडीने मंजुरी मिळावी याकरिता आमदार बबनराव शिंदे यांचे ऊर्जामंत्री व शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न सुरू आहेत.
- चौकट - सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र विजेच्या समस्या आहेत विशेषतः माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील अनेक ठिकाणी पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना सातत्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे यासाठी महावितरण कंपनीकडे माढा मतदार संघातील तीनही तालुक्यांमध्ये विविध 8 ठिकाणी अतिरिक्त 5 एमव्हीए ट्रांसफार्मर व सहा ठिकाणी नवीन 33/11 केव्ही सबस्टेशनची मागणी केलेली असून याबाबत प्रस्ताव तयार करून तातडीने कार्यवाही होण्याकरिता महावितरणचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांना सूचना दिलेल्या आहेत.पुढील काळात ही कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले आहे.
फोटो ओळी- आमदार बबनदादा शिंदे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा