Breaking

शुक्रवार, १८ जून, २०२१

खटाव पंचायत समितीचा लिपीक एसीबीच्या जाळ्यात



*खटाव पंचायत समितीचा लिपीक एसीबीच्या जाळ्यात*

वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

          जिल्हा परिषदेतून अनुदानावर वस्तु खरेदी करण्यास मदत करण्याच्या बदल्यात खटाव तालुक्यातील एका शेतकऱ्यांकडून साडेआठ हजारांची लाच घेताना खटाव पंचायत समितीचा लिपिक रविकांत नारायण लोहरा यांना सातारा एसबीने रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई वडूज येथे झाली असली तरी खळबळ जिल्हा परिषदेत उडाली आहे.
        मिळालेल्या माहितीवरून खटाव तालुक्यातील एका शेतकऱ्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ऊसाचे रस यंत्र खरेदी करावयाचे होते. त्यासाठी त्यांनी वडूज पंचायत समितीत अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज लिपीक लोहरा यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या २० टक्के या योजनेतून ऊसाचे यंत्र खरेदी करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी त्या शेतकऱ्याकडे साडेआठ हजार रूपयेची मागणी केली होती.यानंतर संबधीत शेतकऱ्याने सातारा एसीबीकडे तक्रार केली होती. मिळालेल्या तक्रारी नुसार सातारा एसबीच्या पथकांने वडूज पंचायत समिती परिसरात सापळा रचून लोहरा हा पैसे मागत असल्याची पडताळणी केली. त्यानंतर तक्रारदार शेतकऱ्याकडून लाच म्हणून साडेआठ हजार रूपये घेताना त्याला ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेतलेल्या लोहरा यांच्याकडे चौकशी करून त्याच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
        ही कारवाई एसीबीचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधिक्षक सुहास नाडगौडा, सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, हवालदार भरत शिंदे, संभाजी काटकर, तुषार भोसले यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा