वडोलीच्या सरपंचपदी स्वाती चव्हाण यांची बिनविरोध निवड
टेंभुर्णी (प्रतिनिधी):- माढा तालुक्यातील वडोली येथे घेण्यात आलेल्या सरपंच निवड प्रक्रियेत सौ स्वाती अतुल चव्हाण यांची निवडणूक अधिकारी तथा मंडळ अधिकारी शबाना कोरबु यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.
वडोली गावची सन 2018 साली झालेल्या निवणुकीत सात ग्रामपंचायत सदस्य व सौ अर्चना आप्पासाहेब बंडगर यांची जनतेतून सरपंच म्हणून निवड झाली होती. त्यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने वडोली गावचे सरपंच पद रिक्त असल्याने प्रशासनाने सरपंच निवड प्रक्रिया दि. 13/07/2021 वार मंगळवार रोजी जाहीर केली होती. यावेळी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या वेळेत सरपंच पदासाठी स्वाती चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी सात सदस्या पैकी नूतन सरपंच स्वाती चव्हाण, तानाजी गाडे-पाटील, उपसरपंच स्वाती बिटू सुरवसे, सुप्रिया शिवाजी जाधव, सुभाष जगन्नाथ लोकरे व स्वाती गणेश खडतरे हे सहा सदस्य उपस्थित होते.
सदर निवडणुक प्रक्रियेत ग्रामसेवक नारायण सोनवणे यांनी प्रोसिडिंग लिहले तर तलाठी दादाराम गुटाळ, ग्रामसेवक नारायण सोनवणे, पोलीस पाटील धनाजी काळे-पाटील, कोतवाल सुदर्शन गुरव, कॉम्प्युटरऑपरेटर विकी मोरे, शिपाई धनाजी बागाव यांनी मदत केली.
यावेळी माजी सरपंच प्रतिनिधी आप्पासाहेब बँडगर, नूतन सरपंच प्रतिनिधी अतुल चव्हाण, मातंग जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बागाव, संजय कांबळे, गोरख भाग्यवंत, सुखदेव मोरे, अमोल चव्हाण, गणेश खरतडे, चंद्रकांत जाधव, शंकर सुरवसे, शिवाजी जाधव, मच्छिंद्र मोरे, सुरेश चव्हाण, बाळू बागाव, मच्छिंद्र भाग्यवंत, सुरेश विठ्ठल मोरे, प्रकाश चव्हाण यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड प्रक्रियेनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची मुक्त उधळण केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा