रिलायन्स कंपनीत प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना कायमस्वरूपी कामावर घ्या
अन्यथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा
पेण/प्रशांत पोतदार
रायगड जिल्ह्यातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीत सुरु असलेल्या डिप्लोमा ट्रेनी (केमिकल) व बि. एस. सी. ट्रेनी (केमेस्ट्री) कामगार भरती मध्ये प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांना प्रथम प्राधान्य द्या अन्यथा येत्या पंधरा दिवसात प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स गेट समोर आंदोलन करणार असल्याचे निवेदन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन तर्फे कंपनी व्यवस्थापन व जिल्हाधिकार्यांना देण्यात आले होते .
पूर्वीची आय.पी.सी.एल सद्यस्थितीतील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्रधारक हे बहु संख्येने बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सभासद झाले आहेत रिलायन्स कंपनी येथील कामापासून वंचित असलेल्या प्राधान्य प्रमाणपत्र धारकांनी लोकशासन आंदोलन संघर्ष समिती यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर २७/११/२०२० ते १८/ १/२०२१ पर्यंत ५३ दिवसांचा रिलायन्स मटेरियल गेट समोर ठिय्या आंदोलन करण्यात आला होता परंतु ३१ डिसेंबर २०२० रोजी खासदार सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांच्या प्रश्नांबाबत निगडित असलेले प्रशासकीय अधिकारी मे रिलायन्स व्यवस्थापन वरिष्ठ अधिकारी तसेच लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीतील प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकास ठेकेदारी (कंत्राटी) पद्धतीमध्ये कामावर रुजू करून घेण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांस मान्य झाला नाही
यामुळे प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांस योग्य न्याय मिळावा यासाठी रिलायन्स व्यवस्थापन नागोठणे वरील अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त संघर्ष सामाजिक संस्था यांच्यात बैठक बोलावून चर्चेच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक यांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनी मध्ये कायमस्वरूपी कामावर कामगार म्हणून घेण्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा येत्या काही दिवसात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन व भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त संघर्ष सामाजिक संस्था अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रिलायन्स गेट समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन तर्फे कंपनी व्यवस्थापनेला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
--------------------------
रिलायन्स कंपनीत प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावे अन्यथा अन्यथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा