मेघश्री गुंड हिस राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेतील बक्षिसाचे वितरण
माढा / प्रतिनिधी- अहमदनगर येथील मंथन वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने सन 2020 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनी मेघश्री राजेंद्रकुमार गुंड हिने राज्यात 6 वा क्रमांक पटकावला होता त्याबद्दल तिला स्मन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम शाळेचे मुख्याध्यापक सुभाष लोखंडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत मेघश्री गुंड हिने 150 पैकी 140 गुण प्राप्त करून उज्ज्वल यश संपादित केले होते.कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे प्रत्यक्ष बक्षीस वितरण समारंभपूर्वक न करता शाळा स्तरावरच करण्यात आले.याप्रसंगी मुख्याध्यापक सुभाष लोखंडे म्हणाले की,कोरोनाच्या संकटामुळे जरी शाळा प्रत्यक्षात सुरू नसल्या तरी विविध सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा,ऑनलाइन व स्वाध्याय उपक्रम,शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ठेवण्याचे काम शाळेतील शिक्षकांनी सातत्याने केले आहे.लहान गटातील मेघश्री गुंड या चिमुकल्या मुलीने विविध स्पर्धा परीक्षेत जिल्ह्य व राज्य पातळीवर क्रमांक पटकावून गावाचा व शाळेचा नावलौकिक उंचावला असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
याप्रसंगी वर्गशिक्षक भारत कदम, गोरखनाथ शेगर,अंकुश गवळी,विजय काळे,सुप्रिया ताकभाते यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो ओळी- विठ्ठलवाडी ता.माढा येथे मुख्याध्यापक सुभाष लोखंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व बक्षीस स्वीकारताना मेघश्री गुंड बाजूला भारत कदम व गोरखनाथ शेगर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा