तलाठी कुंटुरकर यांच्या कडून नुकसानग्रस्त शेतीची पहाणी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा तालुक्यातील उमरा व परिसरातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेत जमीन व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मौजे उमरा येथील तलाठी पी.जी.कुंटुरकर यांनी नुकसानग्रस्त शेतीची पहाणी करून इ.पीक द्वारे शेतातील पिकाची नोंद करण्यासाठीची शेतकऱ्यांना माहिती दिली.
यात हळद कापूस सोयाबीन उडीद मूग ज्वारी यासह अनेक पिकांची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे.गत दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. मंगळवारी तालुक्यातील काही भागात ढगफुटी झाली आहे.
तालुक्यातील उमरा व परिसरातील कोठेही जीवितहानी झाल्याची माहिती प्राप्त झाली नाही.शेतात पुराचे पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले आहे.पंचनामे केल्यावर नुकसानीचा अंदाज येईल मंगळवारी लोहा तालुक्यातील उमरा दांड्या सह तलाठी पी.जी.कुंटूरवार यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
यावेळी पहाणी करतांना तलाठी पी.जी.कुंटुरकर पोलीस पाटील आनंदराव सिरसाट शेतकरी दाजीराव सिरसाट, गंगाधर सिरसाट पांडुरंग बोडके, राम पवार,विठ्ठल वरपडे करीम शेख,मुबिन शेख आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा