*नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी कॉग्रेसचे रास्ता रोको आंदोलन ..*
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
आज दिनांक ३. सप्टेबर रोजी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार प्रदीप जी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या विरोधात इस्लापूर नाका येथे नांदेड - किनवट मुख्य- महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रास्ता रोको आंदोलनात इस्लापूर शिवणी, जलधरा, अप्पारावपेठ, परिसरातील जनतेने मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, पदाधिकारी यांनी विविध मागण्यासाठी केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात मत व्यक्त केले. त्यावेळी आंदोलनात दिनकर दहिफळे, प्रकाश गब्बा राठोड, जयवंत वानोळे,अनिल पाटील कऱ्हाळे, वैजनाथ करपुडे पाटील,शिवाजी घोगरे पाटील, बालाजी बामणे निर्गुण पाटील,शिवाजी बोटेवाड डॉ. गंगासागर, डॉ. सुभाष वानोळे सुरज जाधव गणेश मोतेवार, बंटी भाऊ आडे, बाळासाहेब शेरे, मनोज राठोड, आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पद्धधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते केंद्र सरकारच्या विरोधात रास्ता रोखुन विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. हिमायतनगर ते किनवट राज्य महामार्गाचे कामाची सखोल चौकशी करून नवीन गुत्तेदारांना सोपविण्यात यावा. गेल्या वर्षी भरलेल्या प्रधानमंत्री पिक विमा योजना तातडीने वाटप करण्यात यावा. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली असून पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी. हिमायतनगर ते किनवट चालू असलेल्या हायवे रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात पिक प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. होणारे नुकसान टाळावे व त्यांना भरपाई देण्यात यावी.कोसमेट भिसी कोल्हारी रेल्वे ब्रिज अंडर खाली असलेल्या पुलाखाली पावसाळ्यात पाणी साचून येणाऱ्या-जाणाऱ्या जनतेचा संपूर्ण तुटत आहे. तो होणारा त्रास टाळावा. वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्याचा पिकाचा होत असलेला नुकसान थांबावा व झालेल्या शेतकऱ्यांची नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी. इस्लापूर शिवणी सर्कल मध्ये असणाऱ्या प्रत्येक गावात वीज पुरवठा सुरळीत करा शेतकरी विरोधी तीन कृषी कार्य कायदे वापस घ्यावे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्यावा. सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये द्यावे. खाजगीकरण रद्द करावे. अशा अनेक प्रकारच्या मागण्या घेऊन आंदोलनकत्यानी आंदोलन केले. नंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी महसूल खात्याचे नायब तहसिलदार शेख याना निवेदन देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा