Breaking

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

वंचित बहुजन आघाडी सोलापूर (पश्चिम) माढा यांच्या पुढाकाराने ईर्ला ता. उस्मानाबाद या पुरग्रस्त गावास अन्न धान्य व जीवनावश्यक किराणा किट, व गरम कांबळ इत्यादीचे वाटप* .



*वंचित बहुजन आघाडी सोलापूर (पश्चिम) माढा यांच्या पुढाकाराने ईर्ला  ता. उस्मानाबाद या पुरग्रस्त गावास अन्न धान्य व जीवनावश्यक किराणा किट, व गरम कांबळ इत्यादीचे वाटप* .



उसमानाबाद दि .7, ऑक्टोंबर  2021,रोजी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण (दादा ) रणबागुल यांच्या नेतृत्वाखाली तसेच वंचित बहुजन आघाडी सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण, जिल्हा महासचिव विशाल नवगिरे, यांच्या पुढाकाराने ईर्ला  ता. उस्मानाबाद या पुरग्रस्त गावास अन्न धान्य व जीवनावश्यक किराणा किट व गरम कांबळ, इत्यादीचे वाटप माढा तालुका प्रसिध्दीप्रमुख शांरग गायकवाड, गणेश खरात राजु वाघमारे, किरण कांबळे, या टिमने समक्ष येऊन 100 कुंटुंबांना वाटप केले ,त्यांचे सोबत वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड. जिनत प्राधान, महासचिव बाबासाहेब जानराव महिला जिल्हा संघटक सुजाता बनसोडे, अदिनी सहकार्य केले . यावेळी जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव यांनी वंचित बहुजन आघाडी सोलापूर (पश्चिम )माढा येथून आलेल्या सर्व टीम चे स्वागत करून त्यांचे अभिनंदन व आभार मानले . यावेळी बोलतांना ते म्हणाले की,श्रध्देय अँड. बाळासाहेब आंबेडकर यांचा पक्ष हा गोरगरीबासाठी त्यांच्या आडचणी सोडवणारा , प्रसंगी आपल्या परिने आपत्कालीन परिस्थितीत सापडलेल्यांना मदत करणारा पक्ष असून हे वेळोवेळी आपल्या कृतीतुन दाखात असल्याचे दिसून येत आहे . हा पक्ष 80 टक्के समाजकारण व 20 टक्केच राजकारण करणारा पक्ष असल्याचे आपल्या दिसून येते . यावेळी महिला जिल्हाध्यक्षा अँड. जितन प्रधान यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की, मी व माझी टीम 30 सप्टेंबर रोजी आपणास भेटलो तेव्हा आपण अन्नधान्य पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले असल्याने दररोजच्या खान्याचा प्रश्न आहे, असे सांगीतले होते व मी आपणांस आमच्या परिने मदत जरूर करु अशे अश्वासन दिले होते ,त्याची पूर्तता आज सोलापूर टीम मार्फत करत आहोत, त्या बरोबरच अँड. बाळासाहेब आंबेडकर हे राजकारण कमी समाजकारण करण्या वर भर देतात असे सांगीतले . तसेच माढा तालुका प्रसिद्धी प्रमुख शारंग गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आम्ही सन्मानिय  राहुल चव्हाण जिल्हाध्यक्ष सोलापूर पश्चिम माढा  व  जिल्हा महासचिव विशाल जी नवगीरे यांच्या आदेशानुसार सर्व साहित्य पुरग्रस्ता साठी  घेऊन आलो आहोत त्याचा इर्ला गावकऱ्यानी स्वीकार करावा . तसेच श्रध्देय अँड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या पाठीशी  खंभीरपणे आपण उभ रहावे असे आवाहन केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यानंद वाघमारे यांनी केले तर आभार इर्ला गावातील पूरग्रस्त लाभार्थी तांगडे यांनी मानले .


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा