*तुळजाभवानी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमेवर पोलिसांची नाकाबंदी*
उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीची कोजागिरी
पोर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या आदेश दि. 18-20 ऑक्टोबर दरम्यान साजरी होणारी कोजागिरी पोर्णिमेला होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. म्हणून त्याच पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी म्हणून आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमेवर काही महत्वाच्या ठिकाणी पोलीसांची नाकाबंदी करण्यात आली आहे, तसेच उमरगा तालुक्यातील कर्नाटक सीमा भागातील गावांमध्ये कानडी भाषेतील फलक सुध्दा पोलीस प्रशासनाने लावले आहेत.
1)उमरगा पो.ठा.- तलमोड, कसगी 2)मुरुम- केसरजवळगा, कोथळी, आलुर 3)लोहारा- सास्तुर चौक 4)नळदुर्ग - बोळेगाळ, गुळहळी, निलेगाव 5)तामलवाडी- कठारे मिल सोलापूर हद्द 6)तुळजापूर - ढेकरी हद्द 7)बेंबळी - करजखेडा चौरस्ता 8)उस्मानाबाद (ग्रा.)- चिलवडी, कौडगाव 9)येरमाळा- उक्कडगाव 10)वाशी- पारगाव टोल नाका 11)ढोकी - पळसप पाटी 12)शिराढोण - ताडगाव 13)कळंब - मांजरा नदी पुल 14)अंबी - खर्डा हद्द 15)परंडा पो.ठा.- लोहारा फाटा या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. तसेच कानडी भाषीक यात्रेकरुंना संबंधीत आदेशाची माहिती व्हावी या उद्देशाने उमरगा तालुक्यातील कर्नाटक सीमा भागातील गावांत कानडी भाषेतील फलक पोलीस प्रशासनाने लावले आहेत.
तरी जनतेने मनाई आदेशांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीमती- नीवा जैन यांनी केले आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा