Breaking

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

भारतीय जनता पार्टी च्या वतीने, प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय धाराशिव येथे संविधान दिन साजरा*




*भारतीय जनता पार्टी च्या वतीने, प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय धाराशिव येथे संविधान दिन साजरा*



 संविधान दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या* नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
   भारतीय जनता पार्टी धाराशिव च्या वतीने प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय धाराशिव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे पूजन भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी संविधान प्रतिज्ञा वाचन केले ,
त्याचबरोबर ऍड खंडेराव चौरे यांनी संविधान दिनांबद्दल माहिती दिली, या कार्यक्रमास  विजय शिंगाडे ,ऍड कुलदीपसिंह भोसले,अभय इंगळे,दाजीप्पा पवार,प्रवीण सिरसाठे, नरेन्द्र वाघमारे, अमोलराजे निंबाळकर,संदीप इंगळे, विनोद निंबाळकर, अमोल पेठे, सुरज शेरकर,प्रसाद मुंडे,सुनील पंगूडवले,अक्षय भालेराव तसेच शहर व ग्रामीण भागातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा