मतदार यादित नाव समाविष्ट, दुरुस्ती मोहीम-तहसीलदार कुलथे यांचे आव्हान.
श्रीगोंदा-नितीन रोही
२२६ श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अस्तित्वात असलेलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करून त्रुटी विरहीत करण्याचा व चालु वर्षीच्या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्ष पूर्ण होणारे नवमतदार यांची नोंदणी करून मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम सदयस्थितीत चालू आहे. तरी हा उपक्रम गावातील प्रत्येक नागरीकांपर्यंत सुलभतेने पोहचावा याकरिता प्रत्येक गावामध्ये दिनांक १६/११/२०२१ रोजी मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी व नवीन नोदणी या सर्व बाबीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच शनिवार व रविवार या सुटटयांच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहिम आयोजीत करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने दि १३-१४ नोव्हेंबर२०२१ व २७-२८ नोव्हेंबर २०२१ रोजी श्रीगोंदा तालुक्यात सदर मोहिम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदार/नवमतदारांनी बी. एल. ओ यांच्या मार्फत फॉर्म नं ६, ७, ८ व ८अ फॉर्म भरून घ्यावेत.असे आव्हान तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी केले आहे.
मतदान फोटो,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा