Breaking

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

नळदुर्ग येथे कर्नाटक मुख्यमंत्रीचा जाहीर निषेध करण्यात आला.

**************advt*******************

नळदुर्ग येथे कर्नाटक मुख्यमंत्रीचा जाहीर निषेध करण्यात आला.

प्रतिनिधी अजित चव्हाण नळदुर्ग

   तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहर 
शिवसेनेच्या वतीने आज कर्नाटक च्या राजधानी बंगळुरू मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळी शाई लावून महाराजांचा अपमान करुन तमाम हिंदुस्थानातील अखंड हिंदू बांधवांच्या व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या वहे कमी की काय म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याने ही क्षुल्लक बाब आहे असे विधान केले.
याच्या निषेधार्थ चावडी चौक ते एसटी स्टँड पर्यंत निषेध मोर्चा काढला व मोर्च्याचे रुपांतर सभेत होऊन कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला जोडे मारुन या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आले.
यावेळी धाराशिव जिल्ह्याचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर काका चव्हाण, उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, माजी तालुका प्रमुख बाळकृष्ण घोडके पाटील, उपतालुकाप्रमुख क्रष्णात आण्णा मोरे, नेताजी महाबोले यांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी जळकोट चे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंतराव पाटील, उपशहरप्रमुख शाम कनकधर, भिमा कोळी,होर्टीचे शिवसैनिक प्रसाद भोसले,युवासेना शहरप्रमुख मयूर हुलगे, युवानेते रवी पिस्के, ओंकार कलशेट्टी, सुर्यकांत घोडके,कल्लपा कांबळे व नळदुर्ग,अणदूर,जळकोट, व होर्टीचे शिवसैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा