Breaking

शनिवार, १५ जानेवारी, २०२२

श्री तानाजी म्हेत्रे यांची राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड.*


*श्री तानाजी म्हेत्रे यांची राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड.*



आज दिनांक,१४ जानेवारी २०२२,रोजी श्री तानाजी म्हेत्रे यांची राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड...
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित, विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी, महाराष्ट्र विद्यालय,तीर्थ बु.ता.तुळजापूर येथील शिक्षक,तानाजी सयाजी म्हेत्रे यांची निवड करण्यात आली. प्रदेशअध्यक्ष बापूसाहेब अडसूळ यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. कार्यक्रमास सोलापूर जिल्हा सल्लागार दत्तात्रय नन्नवरे, पंढरपूर तालुका अध्यक्ष मुळे,तुळजापूर तालुका शिक्षक सदस्य किसन क्षीरसागर,जीवन उमरे,गवळी,औंढेकर तसेच तुळजापूर येथील पत्रकार  प्रसिद्धीप्रमुख जुबेर (भाई) शेख, तालुका उपाध्यक्ष रुपेश डोलारे, यांच्यासह पत्रकार  उपस्थित होते.
तानाजी म्हेत्रे त्यांनी संघाच्या माध्यमातून शिक्षकाचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असे मत व्यक्त केले.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा