Breaking

मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

*हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे लोकार्पण व पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न**व्यसनमुक्ती संघाचे विजय खटके यांनी केली प्रतिष्ठान ची स्थापना*



*हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे लोकार्पण व पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न*

*व्यसनमुक्ती संघाचे विजय  खटके यांनी केली प्रतिष्ठान ची स्थापना*      

AJ 24Taas News Maharashtra Network tembhurni
टेंभुर्णी प्रतिनिधी:-आमोल भोसले यास कडून 
*************************************

हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे लोकार्पण व पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला व्यसनमुक्ती संघाचे विजय खटके यांनी आपले व्यसनमुक्तीच्या कामा सोबतच आता आरोग्य व सामाजिक कार्य कारणासाठी मकरसंक्रांती चे मुहूर्तावर हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.

त्यांच वेळी नुकत्याच झालेल्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने टेंभुर्णी व परिसरातील पत्रकारांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन नूतन टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल जगताप व ग्रामीण शहर चे अध्यक्ष गणेश पोळ यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. 

प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश खटके यांनी केले या मध्ये त्यांनी प्रतिष्ठानच्या स्थापना करण्याचे उद्दिष्ट सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतिनिधी तुकाराम  ढवळे  होते या वेळी पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सचिन होदाडे, सकाळ चे पत्रकार संतोष पाटील, गणेश पोळ, संतोष वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रतिष्ठान ला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या अध्यक्षस्थानावरून आपले विचार मांडताना तुकाराम ढवळे  यांनी विजय  खटके यांच्या कार्याचे कौतुक करत प्रतिष्ठान यापुढे  कोणते कार्य करणार आहे याबद्दल माहिती दिली खास करून गड किल्ले भ्रमंती ट्रेकिंग तसेच त्यामुळे होणारे शारीरिक व मानसिक फायदे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले या यावेळी बोलताना त्यांनी मी आवर्जून सांगितले की प्रतिष्ठान हे आरोग्याच्या क्षेत्रात व अध्यात्मिक क्षेत्रात खास करून काम करणार आहे त्यामध्ये पाई वारी असेल वेगवेगळ्या कडावर ट्रेकिंग भ्रमंती यामध्ये केवळ आरोग्यविषयक फायदे नसून त्या त्या किल्ल्यांची माहितीही मिळण्यास मदत होणार आहे तसेच ते स्वतःही  प्रतिष्ठानच्या कामास मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी टेंभुर्णी  प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल जगताप, उपाध्यक्ष सतीश चांदगुडे, सचिव सुरज देशमुख  ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पोळ, धनंजय मोरे, संतोष वाघमारे, तसेच पत्रकार संतोष पाटील, गणेश चौगुले, सतीश काळे, हरिचंद्र गाडेकर सर, महेश देशमुख, राजाभाऊ पाटील,सचिन होदाडे , धनंजय भोसले,हे उपस्थित होते. यांचा सन्मान करण्यात आला.
  या कार्यक्रम प्रसंगी तांबवे गावचे   तंटामुक्ती अध्यक्ष नागभाऊ खटके,  टेंभुर्णी येथील पाटील हॉस्पिटल चे डॉ. राहूल पाटील, वडार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते गोरख  देशमुख, विठ्ठल  गायकवाड,  दीपक पाटील ,गणेश लोकरे  भजनदास खटके ,चेअरमन अशोक खटके, या.चेअरमन संतोष खटके , यशोदीप कॅम्पुटर चे गोरख खटके सर  मधुकर खटके ,सुधाकर खटके, जयकुमार भिसे ,अजित वायचळ, सचिन पवार, योगेश पराडे ,गणेश व्यवहारे ,सौरभ खटके, कैलास माने, हनुमंत ढवळे, सचिन तळेकर ,महादेव करंडे, चंदू करंडे, रंगा करंडे ,धनाजी भोसले, बबनराव कोल्हे ,गोटू खटके ,महेश देशमुख, भाऊराव माने ,विशाल माने, रमेशआबा देशमुख, समाधान ढेरे, सागर माने ,रामभाऊ खटके दशरथ थोरात ,पेंटर निलेश शिंदे, सिद्धेश्वर महाडिक शुभम खटके ,अक्षय खटके ,गणेश खटके, समाधान खटके, रमेश देशमुख,  टेंभुर्णी व  परिसरातील आलेले हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे आणि व्यसन मुक्त युवक संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार अशोक खटके यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा