Breaking

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळेतील मुला मुलीना शहर पोलीस स्टेशन उस्मानाबाद यांच्या कडून मिळाली अनोखी भेट*


*मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू  शाळेतील मुला मुलीना  शहर पोलीस स्टेशन उस्मानाबाद यांच्या कडून मिळाली अनोखी भेट*



 उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा. श्री. विजयंत जैस्वाल साहेब यांनी 02 जानेवारी हा "पोलीस वर्धापन दिन" हा मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू  शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन ची माहिती देवून तसेच पोलीस कशा पद्धतीने काम करतात आणि कायदा व पोलीस समाजातील नागरिकांचे कशाप्रकारे संरक्षण करते या बद्दल सखोल माहिती दिली या प्रसंगी पोलीस उप निरीक्षक आर. पी. जाधव यांनी व पोलीस कर्मचारी स्वामी साहेब यांनी तसेच पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचारी यांनी मुलांना व मुलींना पोलीस प्रशासनाविषयी माहिती दिली मुलीनी भविष्यात एम.पी.एस.सी. तसेच यु.पी.एस.सी. परीक्षेच्या माध्यमातून पोलीस बनून देशाची सेवा करावी असे मत मा.श्री. विजयंत जैस्वाल साहेबांनी व्यक्त केले तसेच पोलीस वर्धापन दिन विषयी माहिती दिली या प्रसंगी मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळेचे संस्थापक अध्यक्ष मौलाना अलीमोद्दिन साहेबांनी यांनी पोलीस प्रशासनाकडून मुलांना बोलावून माहिती दिल्याबद्दल आभार व्यक्त केले व मुलांना दिलेली पोलीस प्रशासनाकडून भेट कधीही विसरणार नाही असे मात व्यक केले या प्रसंगी इफ्तेखार पटेल सर ,अझर सर ,चव्हाण सर व अहेमद इनामदार सर उपस्थित होते शेवटी पोलीस निरीक्षक मा. विजयंत जैस्वाल साहेबांनी मुला मुलीना खाऊ देवून काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे आव्हान केले व शाळेतील विध्यार्थी यांनी पोलीस स्टेशन ला भेट दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
मौलाना  अलिमुद्दिन
संस्थापक अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळा खाजा नगर.


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा