*"कोरोना योद्धा म्हणून केवळ कौतुक नको'शासकीय सेवेत कायम करा,- समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेची आरोग्यमंत्री टोपे यांना मागणी.*
प्रतिनिधी :- रूपेश डोलारे. उस्मानाबाद
दि.30/1/2022 रोजी आरोग्यमंत्री टोपे उस्मानाबाद येथे दौऱ्यावर असताना 'समुदाय आरोग्य अधिकारी' संघटनेने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिले.या निवेदनामधे 'कोरोना योद्धा म्हणून केवळ कौतुक करु नका तर आम्हाला शासकीय सेवेत "कायम करा" अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विलास तोडकर, राज्य संघटक डॉ.सुरज मोटे, जिल्हाउपाध्यक्ष डॉ.भागवत राऊत, जिल्हा समन्वयक डॉ.नितीन शिंदे, जिल्हा सचिव श्री.सागर कुंभार, यांनी केली. त्याप्रसंगी तालुका अध्यक्ष डॉ.रविंद्र वाघमारे, डॉ.सुरेश माळी, श्री.गणेश धज तसेच संघटनेचे सदस्य श्री.सुरज मगर, श्री.समर्थ कोरे, श्री.आदेश तांबे,डॉ.प्रविण शेटे उपस्थित होते.
गेली 2 वर्षेहुन अधिक काळ हे कोरोना योद्धे कोविड सारख्या परिस्थितीत ग्रामीण भागात अतिशय प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने लसीकरण,कोविड टेस्टींग,व उपचार आदी कामे अतिशय प्रभावीपणे करत आहेत पन तरीही 1 तारखेला पगार न होणे,कामावर आधारित मोबदला 6-6 महिने न मिळणे लसीकरण भत्ता न मिळणे आदि समस्यांनी वैतागले आहेत.तसेच दरवर्षी मिळणारी 5% वेतनवाढ मंजुर असुनही ती अद्याप मिळाली नाही.
समुदाय आरोग्य अधिकारी यांना इतर अधिकाऱ्यांसारखे आरोग्य विमा व पीएफ यांचाही समावेश व्हावा व जिल्हा बदली व तालुका बदली धोरण लागु करणे यांसारखे विविध गाऱ्हाणे मांडले.
समुदाय आरोग्य अधिकारी संघटना,उस्मानाबाद जिल्हा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा