Breaking

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर वजन काटे तपासणी पथकाची अचानक धाड*


*विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर वजन काटे तपासणी पथकाची अचानक धाड*

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे सर्व वजनकाटे बरोबर -


युनिट नं.1 पिंपळनेर कारखान्याच्या वजनकाट्यांची भरारी पथकाकडून अचानक तपासणी-


बेंबळे।प्रतीनीधी।                  

वजन काटे तपासणी भरारी पथकातील अधिकारी यांनी दि.24 रोजी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथील वजनकाट्याची अचानक तपासणी केली असता कोणतीही तफावत आढळून आली नसून सर्व ऊस वजनकाटे बरोबर असल्याचे आढळून आले आहे.


            याबाबत अधिक माहीती की, 24 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वा.चे सुमारास श्री.अ.ध.गेटमे, उप नियंत्रक वैध मापन शास्त्र सोलापूर, श्री.आर.एल.रूपनर, निरीक्षक वैध मापन शास्त्र विभाग कुर्डूवाडी व श्री.एन.डी.माडे, लेखा परिक्षक श्रेणी-1, सहकारी संस्था(साखर), सोलापूर, शेतकरी प्रतिनिधी श्री.कुबेर गवळी रा.तांदूळवाडी व श्री.संजय तरंगे रा.पापनस या भरारी पथकाने अचानक विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथील सर्व ऊस वजनकाट्याची तपासणी केली. वजन तपासले असता कारखान्याचे वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही. ऊस वजन बरोबर असल्याचे आढळून आले आहे. यावेळी भरारी पथकाने सर्वांचे समोर पंचनामा करून ऊस वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नसून सर्व वजनकाटे बरोबर असल्याचे अहवालात नमुद केले आहे. यापूर्वीही अनेक वेळा भरारी पथकाकडून सर्व ऊस वजनकाट्यांची तपासणी झालेली असून त्यामध्ये  कोणतीही तफावत आढळून आलेली नाही.

               सदरप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, ऊस पुरवठा अधिकारी एन.एन.गायकवाड, सिनिअर इन्स्टुमेन्ट इंजिनिअर ए.पी.माने, वाहनमालक प्रतिनिधी समाधान देशमुख रा.आलेगाब बु,इंकेश्वर खांडेकर रा.डोंगरपिंपळा, अमर सोनवणे रा.हिंगणगाव व वाहन मालक, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा