Breaking

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

तुरोरी येथे पिस्टल ची गोळी लागून महीला गंभीर जख्मी प्रकरणी गुन्हा दाखल.”*



*तुरोरी येथे पिस्टल ची गोळी लागून महीला गंभीर जख्मी प्रकरणी गुन्हा दाखल.”*


*उमरगा तालुक्यात खळबळ*

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.

उमरगा पोलीस ठाणे : तुरोरी, ता. उमरगा येथील ग्रामस्थ- श्रीमती पुजा सागर जाधव या दि. 15.02.2022 रोजी सायंकाळी 18.30 वा. सु. घरासमोरील अंगण झाडत असतांना त्यांना एक गावठी बनावटीचे पिस्टल सापडले. पुजा यांनी ते पिस्टल निष्काळजीपने हाताळल्याने पिस्टलचा चाप (ट्रिगर) दाबला जाताच पिस्टलातील गोळी पुजा यांच्या छातीत लागून त्या गंभीर जखमी झाल्या. यावरुन उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल- वाल्मीक कोळी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन पिस्टल टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीसह पुजा जाधव यांच्या विरुध्द शस्त्र कायदा कलम- 3, 7, 25 सह भा.दं.सं. कलम- 176 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा