*तुळजापूर शहरातील वासुदेव गल्ली येथील अकबर शेख यांना तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने किराणा साहित्य देण्यात आले*
प्रतिनिधी :- रूपेश डोलारे उस्मानाबाद.
एक हाथ मदतीचा कर्तव्याचा
तुळजापूर शहरातील वासुदेव गल्ली येथील अकबर शेख यांच्या पत्र्याच्या शेड ला अचानक लागली गेली या आगीमध्ये दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या मुलाच कपाट, दिवान, फ्रीज, टीव्ही, आदी व घरातील साहित्य जळून खाक झाले,त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले, व मदत नव्हे कर्तव्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर तर्फे किराणा साहित्य देण्यात आले. यावेळी तुळजापूर विधानसभा अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे, संघटक बबन गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप गंगणे अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तोफिक शेख युवक शहराध्यक्ष नितीन आबा रोचकरी, गणेश ननवरे, गोविंद देवकर, आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा