Breaking

शुक्रवार, १७ जून, २०२२

मसला खुर्द ता.तुळजापूर येथे पोलीस चौकीसाठी राष्ट्रवादीचे कि.सेल प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवेंची गृहमंञी दिलीप वळसे पाटीलांकडे मागणी*


*मसला खुर्द ता.तुळजापूर येथे पोलीस चौकीसाठी  राष्ट्रवादीचे कि.सेल प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवेंची गृहमंञी दिलीप वळसे पाटीलांकडे मागणी* 


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.

 मसला खुर्द  ता.तुळजापूर येथे व परिसरात  अनेक अवैध धंद्यांना ऊत अला आहे तसेच परिसरात सतत चोरी, मारा- मारी, हाफ मर्डर, खून, दरोडे, दलित अत्याचार यांसारखे गुन्हे सरास घडत आहे. मसला खुर्द येथून तामलवाडी पोलीस स्टेशन हे 18 कि.मी. अंतरावर आहे. काटी पोलीस चौकी 15  कि.मी. अंतरावर आहे. या मुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे गृहमंत्र्यांची भेट घेऊन मसला गावामध्ये पोलीस चौकीची (आऊट पोस्ट) मागणी केली व गृहमंत्रालयाचे सह सचिव कैलास गायकवाड यांनी मागणीची दखल घेत लवकरच पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांना पोलीस चौकी (आऊट पोस्ट) उभारण्यास सांगू असा शब्द दिला. येत्या काळात लवकरच अतुल कुलकर्णी 
पोलिस अधीक्षक, उस्मानाबाद यांची भेट घेऊन पाठ पुरावा करणार  असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल प्रदेश सचिव  ज्ञानेश्वर साळवे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा