*दिव्यांगाच्या पाच टक्के निधी संदर्भात तुळजापूर प्रहार संघटनेच्या वतीने,गटविकास अधिकारी यांना स्मरण पत्र देण्यात आले*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
आज तुळजापूर पंचायत समिती मा गटविकास अधिकारी श्री मरोड साहेब यांना दिव्यांगाच्या पाच टक्के निधी संदर्भात *तुळजापूर प्रहार संघटनेच्या वतीने स्मरण पत्र देण्यात आले* त्यात असे म्हटले आहे की दिनांक २१/०३/२०२२ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की जर आपण ३१/०३/२०२२ पर्यंत संपूर्ण तालुक्यातील दिव्यांग पाच टक्के निधी खर्च करण्यात यावा तो आजतागायत बऱ्याचशा ग्रामपंचायत मधील निधी खर्च करण्यात आलेला नाही जर येणाऱ्या २० जून पर्यंत जर संपूर्ण तालुक्यातील निधी खर्च केला नाही तर प्रहार दिव्यांग संघटनेच्यावतीने दिनांक २३/०६/२०२३ रोजी प्रहार पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा तुळजापूर प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री शशिकांत मुळे यांनी दिलेला आहे यावेळी उपस्थित तुळजापूर शहर अध्यक्ष श्री नागेश कुलकर्णी बिभीषण गुंड अभिमन्यू सगट महादेव सोनवणे राऊत गुलाम फकीर तसेच आधी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा