अधिकारी फाउंडेशन कडून MBBS मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीला आर्थिक मदत
प्रतिनिधी इंदापूर
शशिकांत सोनटक्के
अधिकारी फाउंडेशन स्पर्धा परिक्षा करणाऱ्या आणि इतर गरजू विद्यार्थिना मदत करण्याचे कार्य करते असेच एक कार्य इंदापूर तालुक्यातील रुई गावातील स्नेहा गावडे या MBBSच्या विद्यार्थिनीला केली
स्नेहा राजेंद्र गावडे मूळ गाव पारवडी ता. बारामती लहानपणापासून सगळे भावंडे व आई ही लहान पणापासूनच आज्जी सिंधू सोपान मराडे कडे रा. मराडेवाडी ता. इंदापूर येथे राहतात.व आज्जी सांभाळ करते. आजोबा दोन वर्षांपूर्वी हृदयवीकराच्या आजाराने गेले तेव्हा NEET चा स्टडी करत होते . कुटुंबामध्ये आजी वयस्कर स्नेहा व 2 लहान बहिणी व लहान भाऊ असे चार भावंडे, स्नेहा इयत्ता चौथी मध्ये व लहान भाऊ हा अगदी दोन महिन्याचा असताना अपघातामध्ये वडिलांचे छत्र हरवले. व त्याचा परिणाम आईच्या मेंदूवर झाला त्यामुळे आई मनोरुग्ण आहे डॉ. सोळूंखे बारामती येथे उपचार चालू आहेत आज्जी अंगणवाडी सेविका असून आज्जी चा हृदयविकर यावर उपचार चालू आहे या सर्व हलखीच्या परिस्थितीतून स्नेहाने 2019 च्या NEET मध्ये यश संपादन करून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव याठिकाणी प्रवेश मिळवला. इयत्ता दहावी मध्ये श्री बाबीर विद्यालय रुई येथे सेमी इंग्लिश मध्ये 2016 मध्ये विद्यालयामध्ये 96%गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला होता. त्यांनंतर अकरावी व बारावी सायन्स साठी बारामती येथील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडेमी मध्ये प्रवेश घेतला नंतर बारावी व NEET चा स्टडी केला त्यावेळी पहिल्याच प्रयत्नात MBBS साठी सेमी गव्हर्नमेंटने नंबर लागला होता परंतु एवढा खर्च करण्याची ऐपत नव्हती या सर्व हलखीच्या परिस्थितीतून स्नेहाने एक वर्ष स्टडी केला व 2019 च्या NEET मध्ये यश संपादन करून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव याठिकाणी प्रवेश मिळवला. आत्ता च MBBS प्रथम वर्षाचा निकाल लागला त्यामध्ये प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादन केले. अत्यंत बिकट प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत असलेल्या स्नेहाची माहिती अधिकारी फाउंडेशनचे अध्यक्ष उस्मान शेख , सचिव पत्रकार महेंद्र शेलार, विश्वस्त प्रा. अमोल मराडे यांना समजताच स्नेहास संपुर्ण MBBS वर्षांची फी पुणे येथील JSPM कॅम्पसच्या अधिकारी फाउंडेशनच्या कार्यक्रमात चेक रूपी देऊ केली यावेळी JSPM कॅम्पस हडपसरचे डायरेक्टर डॉ मनोहर कोराडे, इंकाई व्हील्स कंपनीचे AGM योगेश चांदगुडे सर उपस्थित होते स्नेहा गावडे या तरुणीला भविष्यात येणाऱ्या सर्व फी साठी अधिकारी फाउंडेशन मदत करेल असे फाउंडेशनचे अध्यक्ष उस्मान शेख यांनी सांगितले अधिकारी फाउंडेशन ही MPSC/UPSC अभ्यास करणाऱ्या मुलासाठी जुलै महिन्यात पात्रता परीक्षा घेऊन 100 मुलाची निवड करून त्याची पुणे येथे राहणे, खाणे, अभ्यासिका, मागदर्शन 1 वर्ष पूर्ण पणे मोफत दिले जाईल असे अधिकारी फाउंडेशन चे अध्यक्ष उस्मान शेख यांनी सांगितले यामुळे स्पर्धा परिक्षा करणाऱ्या मुलासाठी नक्कीच लाभ होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा