Breaking

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

शिवरत्नचे शिक्षक रोटरी क्लबच्या नेशन बिलडर पुरस्काराने सन्मानित


शिवरत्नचे शिक्षक रोटरी क्लबच्या नेशन बिलडर पुरस्काराने सन्मानित


प्रतिनिधी/अकलूज 

देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात तेच खरे देशाच्या भविष्याचे निर्माणकर्ते आहेत असे विचार रोटरी 3131 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. अनिल परमार यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब सराटी डिलाईट यांच्या वतीने आयोजित केलेल्या नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. 

रोटरी क्लब सराटी डिलाईट यांच्या वतीने शिवरत्न शिक्षण 
संस्थेच्या विजयसिंह मोहिते-पाटील नर्सिंग काॅलेजचे प्राचार्य प्रसाद पाटील, SMP इंग्लिश मिडीयम स्कल मधील शिक्षक अनिल महामुनी,शिवरत्न सीबीएसई स्कूल मधील जुलेखा मुकबील, तसेच शिवरत्न मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालयाचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा.तानाजी काशिद,प्रशांत पवार यांना नेशन बिलडर पुरस्काराने गौरविण्यात आले.

याप्रसंगी शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील व उपाध्यक्ष शितलदेवी मोहिते-पाटील यांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले,

सदर कार्यक्रमासाठी माळशिरस तालुक्यातील मुख्याध्यापक,शिक्षक,असिस्टंट गव्हर्नर गणेश काळभोर रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष दिपक फडे, सेक्रेटरी केतन बोरावके, नितीन कुदळे,माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे, नितीन दोशी,सोनाली सोनाज, रेवती राणे व रोटरी क्लब सराटी डिलाईट चे सर्व सदस्य उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब सराटी डिलाईट चे अध्यक्ष स्वाती  चंकेश्वरा यांनी केले तर आभार सेक्रेटरी जगदीश कदम यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा