टेंभुर्णी येथील युवा नेते राम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २०० जणांचे रक्तदान
टेंभुर्णी (प्रतिनिधी) :- युवा नेते राम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह येथे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान कार्यक्रमास सुरुवात झाली. ५ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरूण कार्यकर्त्यांची उस्फूर्त गर्दी रक्तदान करण्यासाठी दिसून आली. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून अशा तरूण कार्यकर्त्यांनी आपले वाढदिवस साजरे केले तर गरजू लोकांना रक्त पुरवठा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. याचा आदर्श सर्व समाज बांधवांनी घेऊन "रक्तदान सर्व श्रेष्ठ दान"समजून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असा संदेश यावेळी गेला.
आपण सर्वांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत अनेकांचे जीव वाचवण्यासाठी मदत करून आणि माणुसकीचे दर्शन घडवले. या रक्तदान शिबिरात २०० इतक्या रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले या रक्तदान शिबिरात रक्त संकलनासाठी कुर्डूवाडी ब्लड सेंटर, कुर्डूवाडी या रक्तपेढीने सहकार्य केले.
यावेळी माढा वेल्फेअर फाउंडेशन चे अध्यक्ष धनराज शिंदे , भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे , सरपंच प्रमोद कुटे , टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर ,काँग्रेसचे अध्यक्ष ऋषिकेश बोबडे , शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख , भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष उमेश पाटील , टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य जयवंत पोळ , ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब महाडिक , विकास धोत्रे, धनंजय मोरे , रामभाऊ शिंदे , राजकुमार धोत्रे , ॲड . मंगेश देशमुख , विजयकुमार कोठारी , परमेश्वर खरात , महेंद्र वाकसे , डॉ . राहुल पाटील , राहुल टिपाले , शिवाजी गोंदील , रामभाऊ वाघमारे , ॲड . अजिंक्य संगितराव , टेंभुर्णी प्रेस क्लब चे अध्यक्ष डि.एस. गायकवाड, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण ,सचिव सचिन होदाडे , अनिल जगताप ,संतोष वाघमारे, सतिश चांदगुडे , गणेश चौगुले आदी उपस्थित होते . हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी दिलीप पवार , संतोष धोत्रे , दीपक पवार , लखन पवार , सचिन पवार , कालिदास पवार , विकास सुर्वे , कृष्णा धोत्रे , प्रतीक माने, नितीन चव्हाण, आकाश जगताप , सुरज जाधव , शुभम कांबळे , अजय पवार , टिंकू कीर्ते, योगेश पवार , नाना चौगुले , विशाल पवार , बाळासाहेब भोज , सुरज पवार , शंकर चंदनशिवे , सज्जन पवार, विशाल धोत्रे , हनुमंत पवार, संतोष शिंदे यांच्यासह राम पवार मित्रपरिवार व जय बजरंग ग्रुप टेंभुर्णी यांनी परिश्रम घेतले.
*चौकट*:
-रक्तदाना बरोबरच टेंभुर्णी येथील उजनी नगर जि.प. शाळेत वही, पेन, शालेय साहित्य वाटप.अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात वृक्षारोपण, टेंभुर्णी ग्रामपंचायत मधील महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी वाटप करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा