Breaking

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

मागेल त्याला दूध डेअरी, पंढरपूर तिर्हे सोलापूर या रस्त्यासाठी 14 कोटी रुपये निधीची तरतूद-रणजीत सिंह शिंदे


मागेल त्याला दूध डेअरी, पंढरपूर तिर्हे सोलापूर या रस्त्यासाठी 14 कोटी रुपये निधीची तरतूद-रणजीत सिंह शिंदे 



बेंबळे/प्रतिनिधी                             

जिल्हा दूध संघास वैभव प्राप्त होण्यासाठी जो अर्ज करेल त्याला लगेच दुध डेअरी दिली जाईल म्हणजे मागेल त्याला डेअरी अशी घोषणा जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत सिंह शिंदे यांनी केली तर माढा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पंढरपूर ते सुस्ते या तिर्हे मार्गाच्या प्रमुख रस्त्यासाठी 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली 


माढा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील सुस्ते बिटरगाव अंजनसोंड शेगाव दुमाला या गाव भेट दौऱ्यासाठी शिंदे आले होते  यावेळी सुस्ते येथे बोलताना मागेल त्याला दूध डेअरी ही संकल्पना राबविण्यात येईल तर पंढरपूर ते सुस्ते या मार्गा वरील डांबरी रस्त्याचे काम उन्हाळा संपते पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे शिंदे यांनी बोलताना सांगितले. 

प्रारंभी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी रणजीत सिंह शिंदे यांचा सत्कार केला यावेळी माजी सरपंच हरिभाऊ घाडगे  बाळासाहेब लोकरे अनिल घाडगे बाळासाहेब करपे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बोबडे दिलीप चव्हाण सोसायटीचे  व्हाईस चेअरमन संभाजी चव्हाण तानाजी नागटिळक संजय पाटील विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण शेती अधिकारी इंगवले साहेब दूध संघाचे संकलन अधिकारी नाईकनवरे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. 

मी जिल्हा दूध संघाचा अध्यक्ष होण्याच्या अगोदर फक्त 17000 लिटर दुधाचे संकलन होत होते हा दुध संघ मृत अवस्थेत होता मी चेअरमन झाल्यानंतर दररोज संघाकडे 70 हजार लिटर दूध संकलन होत आहे आता हे संकलन एक लाख लिटर करण्याचेउद्दिष्ट असल्याने प्रत्येक गावात मागेल त्याला दुधाची डेअरी देण्यात येईल. गेल्या अनेक दिवसापासून सुस्ते येतील भीमा नदीच्या पात्रात बुडीत बंधारा बांधण्याची मागणी होत आहे परंतु पुळुज व अंजन सोड येथे बंधारा असल्याने या बंधाऱ्यासाठी प्रशासनाकडून अडचण येत असल्याचे शिंदे यांनी बोलताना सांगितले
    त्यानंतर रणजीत सिंह शिंदे यांनी अजनसोंड देगाव बिटरगाव शेगाव दुमाला आधी गावात मध्ये जाऊन ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी या गावांमध्ये शिंदे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेत असताना ते जागेवरूनच संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून अडचणीचे निरासन करत होते 

  सुस्ते देगाव अंजन सोंड गावातील शेती क्षारपड असल्याने  कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त शिरोळ कारखान्याने राबविलेल्या सरफेस सिस्टीम योजनेची माहिती देण्यासाठी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ शेती अधिका-याच्या उपस्थितीत  या भागात वेळोवेळी शिबीराचे आयोजन करण्यात येईल तर दूध संकलन वाढविण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती शिंदे यांनी पुढे बोलताना केली. 
याप्रसंगी बिटरगाव येथील भाऊसाहेब धुमाळ हरिदास धनवे संभाजी धनवे उस्मान तांबोळी विलास सरडे महादेव यादव ग्रामसेवक हनुमंत खवळे अंजनसोंड येथील माजी सरपंच दत्ता घाडगे सरपंच रूपालीताई घाडगे  एकनाथ डुबन ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडगे संजय डुबल अरुण घाडगे देगाव येथील विलास पाटील मनोहर पाटील सरपंच पती संजय घाडगे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष औदुंबर पाटील अमोल पाटील दत्तात्रय कांबळे शेगाव धुमाला येथील सरपंच प्रकाश घोडके बंडू आटकळे विष्णू आटकळे बाळासाहेब काटे राजाभाऊ आटकळे उपस्थित होते 

चौकट
सुस्ते गावच्या विकासासाठी आमदार बबनदादा शिंदे यांनी अनेक वेळा भरून निधी दिला असून यापुढे रणजीत शिंदे आमदार होईपर्यंत हा गाव त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी असेल असे प्रतिपादन व ग्वाही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी दिली 

गावाकडे दौऱ्याप्रसंगी सुस्ती ते आले असता रणजीत सिंह शिंदे यांचा सत्कार करताना दिलीप घाडगे सोबत पदाधिकारी व मान्यवर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा