* बेंबळे येथे घरोघरी गौरीं चे उत्साहात आगमन **
बेंबळे।प्रतिनिधी।
बेंबळे येथे घरोघरी गौरींचे अतिशय उमंग उत्साहात आगमन - स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी गौरींच्या मूर्तींचे पूजन करून --"कोण आली, लक्ष्मी आली.. कशाच्या पावलाने आली.. सोन्या रुपयाच्या पावलांनी आली** गाई गुरांच्या पावलांनी आली... धनधान्य सुख-समृद्धीच्या पावलांनी आली **असे म्हणत गौराईंची तुळशी वृंदावनापाशी भेट घडवून व घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर चांदीच्या भांड्यात ठेवलेले तांदूळ ओलांडून घरामध्ये गौराईंचे, लक्ष्मीचे आगमन-स्वागत व पूजन करण्यात आले,नंतर सुहासिनींनी एकमेकीला हळदीकुंकू लावून ,साखर वाटून, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा