कृषी शास्त्रज्ञ डॉ. योगेश पवार ' बेस्ट एक्सटेंशन एज्युकेशनिस्ट' पुरस्काराने सन्मानित ....
बेंबळे। प्रतिनिधी
बेंबळे येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. योगेश दत्तात्रय पवार यांचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन केल्याबद्दल गुजरात सरकारचा प्रतिष्ठित असलेल् " बेस्ट एक्सटेंशन एज्युकेशनिस्ट" पुरस्काराने, गुजरातचे राज्यपाल माननीय आचार्य देवव्रत यांचे हस्ते नुकतेच सन्मानीत करण्यात आले, शासनाचे विशेष प्रशस्तीपत्र आणि पन्नास हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आर, एम, चव्हाण तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी विस्ताराधिकारी, विद्यापीठाचे कुलसचिव व राज्य पातळीवरील कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
योगेश पवार यांचे प्राथमिक शिक्षण बेंबळे येथे तर कृषी विद्यापीठातून एम एस सी व नंतर संशोधन करून डॉक्टरेट ही द्विपदवी त्यांनी संपादन केली आहे ,डॉ. पवार सध्या सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ गुजरात येथे उद्यानविद्या विषयाचे वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत मिरची, खरबूज, आंतरपीक प्लग ट्रेसिंग, लीड ट्रेसिंग टेक्नॉलॉजी, व क्रॉप कव्हर टेक्नॉलॉजी मार्फत स्ट्रॉबेरी लागवड, व्हेजिटेबल ग्राउंड इन जिरेनियम लागवड, नर्सरी व्यावसायिक व ऑक्सिजनल शेती या विषयावर विशेष निर्मिती व संशोधन केले आहे. अभ्यासात्मक कृषी संशोधनाबद्दल डॉक्टर योगेश पवार यांना या पूर्वी काही विशेष राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बेंबळे येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी दत्तात्रय भानुदास पवार यांचे योगेश हे सुपुत्र आहेत. या पुरस्काराबद्दल डॉक्टर पवार यांचे सर्व थरातून उत्साहाने स्वागत होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा