Breaking

मंगळवार, १४ जुलै, २०२०

*टेंभुर्णी जवळ असलेल्या अकोले येथील जावायास कोरोनाची लागण*



टेंभुर्णी [प्रतिनिधी ] टेंभुर्णी पासून जवळच असलेल्या टेंभूर्णी-पंढरपूर रस्त्यावरील अकोले बुद्रुक येथील एका शेतातील वस्तीवर गुजरात वरून सासुच्या सावडण्याच्या विधीसाठी आलेल्या जावयाला कोरणाची  लागण झाल्याने या भागात पुन्हा एकदा एकच खळबळ उडाली आहे.

या जावयास टेंभुर्णीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सलग चार दिवस उपचार करण्यात आले तरीही उपचार करून फरक पडत नसल्याने त्याच्यातील आजाराची लक्षणे दिसून  आल्याने त्यास सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले होते.त्यानंतर आज त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अकोले बु! येथिल त्या वस्तीवर येणारे रस्ते आरोग्य विभागाने व महसूल विभागाने सील केले आहेत.टेंभुर्णीतील व अकोले बुद्रुक येथील या जावयाच्या संपर्कात आलेल्याची संख्या ११ झाली आहे.यामध्ये टेंभुर्णीतील त्या हाँस्पिटलमध्ये असणारे,डाॕक्टर,नर्स,एक मेडीकल दुकानदार,महिला कर्मचारी,लॅब असिस्टंट असे आठजन संपर्कात आले आहेत.तर अकोले बुद्रुक येथे ११ जण त्याच्या संपर्कात आले आहेत.असे एकुण १९ जन संपर्कात आले आहेत.अकोले बुद्रुक येथील हा ४था रुग्ण आहे.