*टेंभुर्णी- अकलूज रोडवर अपघात नितीन गायकवाड यांचे निधन*
*टेंभुर्णी -अकलूज रोडवर खुळे वस्ती नजीक बिघाड झालेला उसाच्या ट्रॅक्टर ला पाठीमागे ट्रॉलीला जाऊन स्विफ्ट डिझायर कारने जोरदार धडक दिल्याने नितीन गायकवाड ही गंभीर जखमी होऊन मयत झाले. असल्याची घटना मंगळवारी रात्री 12.30 च्या सुमारास अकलूज रोड खुळे वस्ती नजीक घडली.
याबाबत टेंभुर्णी पोलिसांकडून सविस्तर मिळालेली माहिती अशी की टेंभुर्णी- अकलूज रोडवरती रात्री 12.30 सुमारास टेंभुर्णीहुन -अकलूज च्या दिशेने जात असताना टेंभुर्णी पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या खुळेवस्ती नजीक अज्ञात उभा असलेला ट्रॅक्टरला पाठीमागील ट्रॉलीला जाऊन स्विफ्ट डिझायर ( MH - 46Z/ 2049 ) ने जोरदार धडक दिल्याने गाडी चालवत असलेले नितीन संभाजी गायकवाड (वय 32) राहणार माळेगाव ता. माढा गंभीर जखमी झाल्याने त्याला ताबडतोब टेंभुर्णी येथील अकलूज चौकामध्ये असलेले पाटील हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले असता ते गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी अकलूज येथील खाजगी हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते.
मात्र उपचाराच्या दरम्यान मयत झाल्याचे अकलूज च्या डॉक्टरांनी घोषित केले. नितीन गायकवाड हे माढा तालुक्यातील शिवसेने कडून विधानसभा लढलेले संजय बाबा कोकाटे यांचे स्नेही होते. त्यांनी विधानसभेच्या वेळेस संजय बाबा कोकाटे यांचा धुरा सांभाळली होती, नुकत्याच झालेल्या माळेगाव ग्रामपंचायत निवडणूक मध्ये ग्रामपंचायत आणण्यासाठी त्याचा सिंहाचा वाटा होता.
त्यांचे टेंभुर्णी येथील अकलूज चौकामध्ये आर्या डिजिटल, कॉम्प्युटर- डिजिटल व्यवसायाने या परिसरात प्रसिद्ध होत
त्यांच्या या निधनाने टेंभुर्णी शहर , माळेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्याच्या पाठीमागे आई -वडील भाऊ व एक दोन वर्षाची लहान मुलगी असून या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा