Breaking

शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

बीड मध्ये मास्क न वापरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू

बीड मध्ये मास्क न वापरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू*
*गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे*

बीड शहरात पोलिसांनी आज सकाळपासून रस्त्यावर उतरत मास्क न वापरणार्‍या दुचाकी चालकावर दंडात्मक कारवाईला सुरूवात केली. 
 दुपारी 12 वाजपेर्यंत जवळपास 180 नागरिकांना दंड ठोठावला आहे.  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकार्‍यांना कोरोनाच्या नियमाबाबत सक्तीच्या सूचना दिल्या.  त्यानुसार कडक अंमलबजावणीस सुरूवात झाली. मास्क वापरूनच प्रत्येक नागरिकांना घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.  आज सकाळपासून शिवाजीनगर वाहतुक शाखा, बीड शहर, पेठ बीडचे पोलीस रस्त्यावर उतरले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा